Rain Update : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड ॲलर्ट, राज्यात आजही मुसळधार!

Rain Update : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड ॲलर्ट, राज्यात आजही मुसळधार!

Rain Update : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड ॲलर्ट, राज्यात आजही मुसळधार!

 

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेध शाळेनं राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट जारी केला आहे. पाच जिल्ह्यांमध्ये कोकणातील दोन आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा समावेश आहे

 

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेध शाळेनं राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट जारी केला आहे. पाच जिल्ह्यांमध्ये कोकणातील दोन आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ अधिकारी के.एस. होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला रेड अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.

आजची स्थिती काय? कोणत्या जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अ‌ॅलर्ट

रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना हवामान विभागानं आजच्यासाठी रेड अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर दुसरीकडे मुंबई, ठाणे, पालघर सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

हे पण वाचा:- पीएम किसान ट्रॅक्टर योजना , ट्रॅक्टर खरेदी वर आता मिळणार 50% सबसिडी

22 जुलै रोजी पावसाचा अंदाज काय?

सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरीला रेड अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

23जुलै रोजी पावसाचा अंदाज काय?

सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी,पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, चंद्रपूर, नांदेड, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईत पावसाचं जोरदार पुनरागमन

मुंबईत पावसानं जोरदार पुनरागमन केलं आहे. मुंबईत मिठी नदी दुथडी भरुन वाहत आहे. समुद्राला आज भरती असल्यानं प्रशासन अ‌ॅलर्ट झालं आहे. मुंबईतील 24 वार्ड मध्ये प्रशासन दक्षझालं आहे. समुद्रात 4 मीटर उंचीच्या लाटा उसळतील असा अंदाज आहे. किंग्ज सर्कल परिसरातही पाणी असल्याचं समोर आलं आहे. काल उसंत घेतलेल्या पावसानं आज पुन्हा कमबॅक केलं आहे.

हे पण वाचा:- पीएम किसान योजना : 6 हजार रु. पती-पत्नी दोघांनाही मिळतात का? नेमका नियम काय? 

नवी मुंबईत जोरदार पाऊस सुरू

काळ पासून रिमझिम सुरू होणाऱ्या पाऊस आता जोर धरला आहे ,नेरुळ,बेलापूर,वाशी,ऐरोली परिसरात पावसात सुरुवात झाली आहे.

संदर्भ:- TV9 Marathi

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *