Search
Generic filters

विदर्भ, मराठवाड्यात गारपिट : आज ‘या’ भागात मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा

विदर्भ, मराठवाड्यात गारपिट : आज ‘या’ भागात मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा

विदर्भ, मराठवाड्यात गारपिट : आज ‘या’ भागात मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा

 

पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २९) विदर्भ, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. राज्याच्या किमान तापमानातील वाढ दोन दिवस कायम राहणार असून, त्यानंतर थंडी पुन्हा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोमवारी अकोला जिल्ह्यात गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. पश्‍चिमी चक्रावातामुळे राज्यांमध्ये पाऊस पडत असून, राजस्थान परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून तेलंगणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला असल्याने महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान झाले आहे.

हे पण वाचा:-केंद्र सरकारच्या ‘या’ तीन निर्णयानंतरही सोयाबीनच्या दरात वाढ, काय आहेत कारणे ?

सोमवारी (ता. २८) दुपारनंतर अकोल्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. तर अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णासह परिसरात गारपीट झाली. राज्यात बहुतांशी भागात गारठा कमी झाला असून, किमान तापमानातील वाढ दोन दिवस कायम राहणार आहे.

मंगळवारी (ता. २८) निफाड येथे नीचांकी ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दोन दिवसांनंतर राज्याच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

विदर्भ : वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.

हलक्या पावसाची शक्यता :

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

https://contact.krushikranti.com/

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *