Search
Generic filters

Havaman andaj : ऐन हिवाळ्यात पावसाच्या सरी, हवामान खात्याकडून Alert, ‘या’ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा!

Havaman andaj : उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्रत 'या' जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा!

Havaman andaj : ऐन हिवाळ्यात पावसाच्या सरी, हवामान खात्याकडून Alert, ‘या’ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा!

 

ऐन हिवाळ्यात राज्यात पावसाच्या सरी  कोसळत आहेत. केवळ रिमझिम पाऊस पडत नाहीये तर हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना चक्क ऑरेंज अलर्टही  जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण असून मुंबई, ठाणे, रत्नागिरीत पावसाच्या सरी कोसळत आहेत.

दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तेथून पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती निर्माण झालीय. या सर्वांमुळे पुढील काही तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता आहे. परिणामी पुढील दोन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने राज्यातील चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. यामद्ये पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे.

हे पण वाचा:- ओमिक्रॉन विषाणूचा परिणाम सोयाबीनच्या दरावर? शेतकऱ्यांनी काय भूमिका घ्यावी?

पुढील हवामानाचा अंदाज

1 डिसेंबर –

कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाच्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तरमध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

मराठवाडा – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

विदर्भ – हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा:- ई-पीक पाहणी : उरलेल्या पीकपेरा नोंदणीचे आता काय होणार?

2 डिसेंबर

कोकण – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

मध्य महाराष्ट्र – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. उत्तर मध्य महाराश्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

मराठवाडा – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

विदर्भ – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हवामान खात्याने दिलेल्या अवकाळी पावसाच्या अंदाजानुसार बुऱ्हाणपूर मध्यप्रदेश क्षेत्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार तापी नदीच्या पातळीत वाढ होऊन भुसावळ तालुक्यातील हातनूर धरणात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला असल्याची माहिती हातनूर धरणाचे शाखा अभियंता एन पी महाजन यांनी मंगळवारी (30 नोव्हेंबर) दिली आहे.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

source:- lokmat 18

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *