havaman andaj : मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात आज मुसळधारेचा अंदाज!

havaman andaj : मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात आज मुसळधारेचा अंदाज!

havaman andaj : मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात आज मुसळधारेचा अंदाज!

 

 

krushi kranti : राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. आज (ता. ७) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला असून, राजस्थानच्या बिकानेरपासून, जयपूर, गुणा, गोंदिया ते बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात समुद्रसपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर परस्पर विरोधी वारे वाहत (शेअर झोन) आहेत.

कमी दाब क्षेत्र मध्य भारताकडे सरकणार

बंगालच्या उपसागराच्या उत्तर आणि पूर्व-मध्य भागात ओडिशा आणि आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यालगत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत ही प्रणाली मध्य भारताकडे सरकण्याची शक्यता आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात दक्षतेचा इशारा

कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यात आज (ता. ७) अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भासह, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज आलर्ट)

कोकण:- रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर.

मध्य महाराष्ट्र:- नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

मराठवाडा:-  औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड.

हे पण वाचा:- सोयाबीन पिकाची काढणी, मळणी व साठवण तंत्र 2021

जोरदार पावसाचा इशारा(येलो अलर्ट)

कोकण:- मुंबई.

मध्य महाराष्ट्र:- नंदूरबार, धुळे, जळगाव, नगर.

मराठवाडा:- उस्मानाबाद, लातूर.

विदर्भ:-  चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया.

source:- ऍग्रोवन

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *