राज्यात पावसाचा जोर वाढणार ‘या’ जिल्ह्याना यलो अलर्ट

राज्यात पावसाचा जोर वाढणार 'या' जिल्ह्याना यलो अलर्ट

राज्यात पावसाचा जोर वाढणार ‘या’ जिल्ह्याना यलो अलर्ट

काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. आज (ता. २२) विदर्भ, मराठवाडा, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेरपासून, कोटा, गुणा, रांची, कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. पूर्व राजस्थान परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कमी दाबाच्या क्षेत्रापासून तेलंगणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे

कमी दाब क्षेत्राची निर्मिती

बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांमुळे पश्‍चिम बंगाल आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यालगत समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात शनिवारपर्यंत (ता. २५) नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होणार असून, पूर्व किनाऱ्याकडे येणाऱ्या या प्रणालीमुळे पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. उद्या (ता. २२) कोकण, विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज असून, जोरदार वारे, मेघगर्जनेसह

हे पण वाचा:- शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केंद्र सरकारची कृषी उडाण योजना, असा घ्या लाभ

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट)

कोकण : मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, सोलापूर. मराठवाडा : बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, जालना. विदर्भ : नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर.

विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट)

मध्य महाराष्ट्र : नाशिक, पुणे, सातारा. विदर्भ : गोंदिया, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, वाशीम.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

 

source:- agrowon

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *