Search
Generic filters

Havaman andaj today : आज पासून मान्सून परतीच्या प्रवासावर, राज्यात ‘या’ भागात पाऊस!

Havaman andaj today : आज पासून मान्सून परतीच्या प्रवासावर, राज्यात ‘या’ भागात पाऊस!

Havaman andaj today : आज पासून मान्सून परतीच्या प्रवासावर, राज्यात ‘या’ भागात पाऊस!

 

भारतात शेती ही मौसमी प्रकारची आहे म्हणजे पावसावर आधारित आणि जवळपास निम्म्याहून अधिक भागातील शेतीवर पावसाचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम पडतो. आता पावसाचा परतीचा दौरा सुरु होणार आहे आणि त्यासंबधी भारतीय हवामान खात्याने अंदाज देखील बांधलाय. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) म्हटले आहे की, बुधवारपासून उत्तर-पश्चिम भारताच्या काही भागातून नैऋत्य मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी परिस्थिती अनुकूल आहे.

मान्सूनचे आगमन आणि परतीच्या वेळी ठरवण्यासाठी गेल्या वर्षीपासून हवामान विभागाने नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार 17 सप्टेंबर ही मान्सूनचा राजस्थानातून परतीची नवीन सर्वसाधारण तारीख निश्चित करण्यात आलिया आहे. या पूर्वी राजस्थानातून माघारीची तारीख 1 सप्टेंबर ठेवण्यात आली होती. मान्सूनची संपूर्ण देशातील परतीची सर्वसाधारण कार्यक्रम 15 ऑक्टोबर आहे.

या वर्षीचा मान्सून चा विचार करता अनियमित दीर्घकालीन वेळेच्या दोन दिवस उशिराने मान्सून केरळमध्ये दाखल झालेला मान्सून केरळमध्ये तीन जून रोजी दाखल झाला. केरळात दाखल होताच मान्सून एक्स्प्रेसचा प्रवास सुसाट गतीने सुरू झाला. अरबी समुद्रातून वेगानं प्रवास करत मान्सून दोनच दिवसात महाराष्ट्रात म्हणजे पाच जूनला पोहोचला. मान्सूनने यंदा पाच दिवसातच (10 जून) संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता. अरबी समुद्रात आलेले शाहीन चक्रीवादळ ओमान कडे गेल्यानंतर भारताच्या काही भागातून मोसमी वारे माघारी परतण्यासाठी अनुकूल हवामान झाले आहे. आज दिनांक सहा पासून मान्सून परतीच्या प्रवासावर निघणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

आज या भागात पाऊस

हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे याभागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. अशी माहिती हवामान विभागाकडून दिली आहे. या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

संबंधित माहिती वाचा:

कांदा चाळ अनुदान योजना : अनुदानाचा लाभ घ्या, कांद्याची साठवणूक करा!

Punjab dakh havaman andaj : 4 ते 8 ऑक्टोबर ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता!

मागेल त्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन, कृषी मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा!

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *