शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! येत्या ५ दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज

शेतकऱ्यांसाठी खुशखबर

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! येत्या ५ दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज

 

मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलं होतं. एवढंच काय दुबार पेरणी करावी लागते की काय अशी चिंता राज्यातील काही शेतकऱ्यांनी मध्ये दिसत होती. मात्र शेतकऱ्यांसाठी हवामान खात्याने आता चांगली बातमी दिली आहे. येत्या पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

नैर्ऋत्येकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे पाऊस पश्चिम बंगाल सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्याकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक जुलैला संबंधित राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. यामध्ये महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक चा समावेश आहे. शिवाय पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीतही जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये पावसासोबत बर्फवृष्टीचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

राजधानी दिल्लीत 23 जुलैला पाऊस होऊ शकतो. पुढील काही तासातच सिक्कीम आसाम अशा काही भागात मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मराठवाड्याच्या काही भागात सध्या आणि मध्यम पावसाची शक्यता आहे. उत्तराखंडचा काही भाग, बिहार मधील, उत्तर भागातील जिल्हे, पश्चिम बंगाल विदर्भाचा काही भाग, मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप आणि छत्तीसगडचा काही भागात दौंड ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. झारखंड आणि अंदमान व निकोबार द्वीप समूहात सौंदर्य आणि काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात आज बहुतांशी भागात आकाश निरभ्र

महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर हवामान तज्ञ हे एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आज बहुतांशी आकाश निरभ्र असेल. पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांच्या वर काही भागात ढग विखुरलेले दिसतील. तसेच काल आयएमडी ने दिलेल्या पूर्व अनुमानानुसार दिवसाच्या उत्तरार्धात काही ठिकाणी गडगडाटासह वीजा चमकू शकतात. अशी माहिती केएस होसाळीकर यांनी दिली आहे.

मुंबईतील धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला

जून महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने ब्रेक घेतला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावात मिळून केवळ 16 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा अधिक आहे. मात्र अद्याप मुंबईत धरणक्षेत्रात पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे पाण्याची पातळी अतिशय धिम्या गतीने वाढत आहे. यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पाऊस कोठे पडणार?

राजधानी दिल्लीत 2,3 जुलैला पाऊस होऊ शकतो. पुढील काही तासांत सिक्कीम, आसामच्या काही भागात, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मराठवाड्याच्या काही भागात सौम्य आणि मध्यम पावसाची शक्यता आहे.

उत्तराखंडचा काही भाग, बिहारमधील उत्तर भागातील जिल्हे, पश्चिम बंगाल, विदर्भाचा काही भाग, मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप आणि छत्तीसगडचा काही भागात सौम्य ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. झारखंड आणि अंदमान व निकोबार द्वीप समुहात सौम्य आणि काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. शेतकऱ्यांसाठी खुशखबर  शेतकऱ्यांसाठी खुशखबर 

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची माहिती मोफत मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *