Search
Generic filters

Hvaman andaj maharashtra : राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता; शेतकऱ्यांची चिंता वाढली

Hvaman andaj maharashtra : राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता; शेतकऱ्यांची चिंता वाढली

Hvaman andaj maharashtra : राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता; शेतकऱ्यांची चिंता वाढली

 

पुण्यासह  राज्यातील काही भागांत पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता  वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्र आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी परिसरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुणे आणि राज्याच्या इतर काही भागांमध्ये येत्या 30 नोव्हेंबरपासून पुढील तीन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

‘या’ जिल्ह्यांत पावसाचा इशारा

पुण्यासह, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’  देण्यात आला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, पुढील तीन दिवसांमध्ये राज्यात पाऊस पडण्याची दाट शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

हे पण वाचा:- पीएम किसान योजनेअंतर्गत आता 2 हजारांऐवजी 5 हजारांचा हप्ता मिळणार का?

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान

दरम्यान यापूर्वीही अवकाळी पाववसाने राज्यात हजेरी लावली होती. या पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. गहू, हरभारा, ऊस, धान या पिकांना मोठा फटका बसला होता. अवकाळी पावसामुळे गव्हाचे पिक भुईसपाट झाले होते. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. आणि आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

source:- tv9

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *