Search
Generic filters

शेतकऱ्यांनो 10 वा हप्ता जमा झाला नसेल तर 11 वा हफ्ता ही मिळणे मुश्किल..! ‘हे’ काम करावीच लागणार

शेतकऱ्यांनो 10 वा हप्ता जमा झाला नसेल तर 11 व्या हप्त्याचीही मिळणे मुश्किल..! 'हे' काम करावीच लागणार

शेतकऱ्यांनो 10 वा हप्ता जमा झाला नसेल तर 11 वा हफ्ता ही मिळणे मुश्किल..! ‘हे’ काम करावीच लागणार

 

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता जमा करुन मोठे गिफ्ट दिले होते. या प्रक्रियेला एक महिन्याचा कालावधी होऊन गेला आहे. मात्र, असे असतानाही अनेकांच्या खात्यावर या 10 व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नाहीत. याकडे तुम्ही दुर्लक्ष करीत असताल तर यामध्ये तुमचे अधिक नुकसान होऊ शकते. कारण (PM Kisan Yojna) पीएम किसान योजनेचा 10 वा (हप्ता खात्यावर जमा झाला नसेल तर 11 वा हप्ताही जमा होणार नाही. कारण जो निर्णय 10 हप्त्याच्या दरम्यान सरकारने घेतला आहे तोच बरोबर असे ग्राह्य धरुन 11 व्या हप्त्याचे पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना सर्व डिटेल्स तपासावे लागणार आहेत. यामध्ये सुधारणा केली तर 10 व्या हप्त्याचेही पैसे मिळणार असून 11 व्या हप्त्याची वाटही मोकळी होणार आहे. त्यामुळे ही प्रक्रीया महत्वाची आहे.

वर्षाला 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर

पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 6 हजार रुपये जमा होता. याकरिता तीन हप्ते करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना ही रक्कम शेती कामासाठी उपयोगी पडेल हा उद्देश केंद्र सरकारचा राहिलेला आहे. गेल्या तीन वर्षापासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. 2 हजार रुपयांप्रमाणेच चार महिन्यातून एकदा जमा होत आहेत. 10 व्या हप्त्याचा देशातील 10 कोटी 9 लाख शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे. यानुसार 20 हजार 900 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्यात आला आहे.

अशा प्रकारे तपासावे लागणार ”स्टेटस’

  1. सर्वात आगोदर pmkisan.gov.in वेबसाइटवर जावे लागेल.
  2. या वेबसाइटच्या उजव्या बाजूला ‘Former Corner’ क्लिक करा.
  3. आता आपल्याला ‘Beneficiary Status’ यावर क्लिक करणे आवश्यक आहे.
  4. तुमचं स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला आधार नंबर, मोबाइल नंबर अशी सगळी माहिती भरावी लागणार आहे.
  5. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण आपले नाव यादीत तपासू शकणार आहात.

हे पण वाचा:- कापसाच्या भावात वाढ होण्याची शक्यता वाढली!

या हेल्पलाईनचाही होणार उपयोग

  • पीएम किसान टोल फ्री नंबर: 18001155266
  • पीएम किसान हेल्पलाइन नंबर :155261
  • पीएम किसान लँडलाइन नंबर : 011—23381092, 23382401
  • पीएम किसान हेल्पलाइनचा नवा नंबर: 011-24300606
  • पीएम किसानची अणखीन एक हेल्पलाईन नंबर: 0120-6025109

source:- tv9 martahi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published.