Search
Generic filters

भारतातील पहिल अत्याधुनिक कांदा लागवड यंत्र

भारतातील पहिल अत्याधुनिक कांदा लागवड यंत्र

भारतातील पहिल अत्याधुनिक कांदा लागवड यंत्र

 

शेतकऱ्यांच्या मुलांनी मजुरांची वाढती टंचाई जाणून घेऊन तयार केले अत्याधुनिक कांदा लागवड यंत्र

कांदा लागवड म्हटलं की, आजवर शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतंय मग वातावरण, विजेची अनियमितता, भेसळ युक्त बी, खताची वाढती टंचाई, मजुरांची कमतरता, व तसेच शेतकरी अनेक समस्यांशी लढताना शेवटी जवर तसा बाजारभाव मिळत नाही.त्यासाठी कुठेतरी व कुणीतरी या समस्यांना तोड देण्यासाठी भक्कम पाया हा रचायलाच हवा. आणि आज त्याच क्षेत्रात शेतकऱ्यांचा मुलांनी बाजी मारली आहे.जगातील सर्वात दाट पीक लागवडीसाठी एकमेव लागवड यंत्र, विदेशातील कांदा शेतीला तोंड देण्यासाठी भारतातील स्वतंत्र लागवड यंत्र आहे.

यंत्राची संकल्पना –

शेतकरी राजा फार्मर्स क्लब हा आमचा शेतकरी गट आहे, आणि ह्याच गटाच्या माध्यमातून आम्ही नवीन नवीन प्रयोग करत असतो. यातूनच आम्हाला राजगुरू नगर मधे आम्हाला एक संकल्पना दिसली की हाताने रोपे कापून मशीन मधे टाकायची आणि नंतर त्याल हाताने दबायच, यात मजूर खूप जास्त प्रमाणात लागायच आणि एका दिवसात कमी लागवड होत असे. याचं संकल्पनेचा आधार घेऊन आम्ही या मशीन ची कमतरता बघून खूप बदल केले, आणि अत्याधुनिक कांदा लागवड यंत्र ची निर्मिती केली.

पारंपरिक पद्धत आणि यंत्राद्वारे लागवडीचे फायदे –

पारंपरिक पद्धत –

१) मजुर जास्त प्रमाणात लागते, ३०/३५ मजुर प्रती एकर लागतात.
२) हाताने ने लागवड केली की ऐकरी रोप संख्या १,४०,००० ते १,८०,००० एवढीच लागवड होते.
३) रोपतील अंतर अनियंत्रित राहते रोपे सरळ उभी राहत नाही.
४) रोपे सरळ उभी राहत नाही त्यामुळे पिका मध्ये खेळती हवा राहत नाही.
५) मजुरांची कार्यक्षमता भासते एक मजूर १.५ ते २ गुंठे प्रती दिवसच लागवड करू शकतो .
६) रोपांची लागवडीची खोली सारखी नसल्यामुळे रोपाला मर रोग लागू शकतो.
७) पारंपरिक पद्धतीने लागवड केल्यास खर्च जास्त लागतो. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन जास्त दिसून हातात उत्पन्न कमी मिळते.

यंत्राने लागवडीचे फायदे-

१) मजुर कमी प्रमाणात लागते, फक्त १० मजुर एक एकर लागवड करू शकतो.
२) रोपतील अंतर नियंत्रित (१४×१२ सेमी.) राहते रोपे सरळ उभी राहते.
३)एक मजूर ४ते ५ गुंठे प्रती दिवस लागवड करू शकतो .
४) शास्त्रयुद्ध पद्धतीनं लागवड केली की रोपंधील अंतर नियंत्रित राहते व हवा खेळती राहते.
५) रोपं जमीनी मध्ये सारख्या खोली वर पडते त्यामुळे मर रोग लागत नाहीं.
६) एकरी खर्च फक्त ५०००/६०००रुपये लागते.

उपलब्ध मॉडेल –

१) पाच सिटर सिंगल बेड फर्रो

लागवड क्षमता – १८,००० ते २०,००० रोप प्रती तास, आठ तासामध्ये तीस गुंठे लागवड होते. या यंत्राच वजन ६५० किलो आहे आणि ५०hp चीपर गियर असलेला ट्रॅक्टर हवा.

२) सहा सीटर सिंगल बेड फर्रो

लागवड क्षमता – २१,००० ते २३,००० रोप प्रती तास, आठ तासामध्ये चाळीस गुंठे लागवड होते. या यंत्राच वजन ८०० किलो आहे आणि ५०hp चीपर गियर असलेला ट्रॅक्टर हवा.

३) आठ सीटर सिंगल बेड फरो

लागवड क्षमता – २८,००० ते ३०,००० रोप प्रती तास, आठ तासामध्ये पन्नास गुंठे लागवड होते. या यंत्राच वजन ९५० किलो आहे आणि ५०hp चीपर गियर असलेला ट्रॅक्टर हवा.

( चीपर गियर – खूप कमी चालायचा गती असणारा गियर.)

प्रतिनिधी – वैभव उगले
कृषी महाविद्यालय, अकोला

संपर्क – Saurabh Prasad Agro innovation LLP,
9730123005

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

1 thought on “भारतातील पहिल अत्याधुनिक कांदा लागवड यंत्र”

Leave a Comment

Your email address will not be published.