Search
Generic filters

विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्राचे वापराकरीता अनुदान

विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्राचे वापराकरीता अनुदान

विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्राचे वापराकरीता अनुदान

उत्पादित वैरणीचा पुरेसा वापर व्हावा यासाठी सर्वसाधारण सर्व प्रवर्गासाठी (शेतकरी,पशुपालक,सहकारी दुध उत्पादक संस्थाचे सभासद) केंद्र पुरस्कृत योजना सुरु करण्यात आली आहे.

योजनेसाठी अटी :
▪ लाभार्थी शेतकऱ्यांकडे कमीत कमी 5 किंवा त्यापेक्षा अधिक पशुधन असणे आवश्यक आहे.
▪ लाभार्थी शेतकऱ्यांने यापूर्वी या योजनेचा कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय संस्थेकडून लाभ घेतलेला नसावा.

लाभाचे स्वरूप असे :
▪ 5 ते 15 पशुधनाकरीता 1 अश्वशक्ती विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्रासाठी 50 टक्के अनुदान, अनुदानाची अधिकतम मर्यादा रु.6000 प्रति यंत्र.
▪ 16 ते 25 पशुधनाकरीता 2 अश्वशक्ती विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्रासाठी 50 टक्के अनुदान, अनुदानाची अधिकतम मर्यादा रु.8000 प्रति यंत्र.
▪ 25 किंवा 25 पेक्षा जास्त पशुधनाकरीता 3 अश्वशक्ती विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्रासाठी 50 टक्के अनुदान, अनुदानाची मर्यादा रु.10,000 प्रति यंत्र.

आवश्यक कागदपत्रे :
अर्ज करताना खालीलप्रमाणे कागदपत्रे
अ) संस्थेसाठी अशी कागदपत्रे सादर करावेत.
✔ प्रस्ताव केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनूसार विहित नमुन्यामध इंग्रजीत सादर करावा.
✔ संस्थेच्या नोंदणी प्रमाणपत्राची प्रत
✔ विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्र खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याची यादी व त्यांच्या कडील पशुधनाबाबत पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र
✔ संस्थेचा प्रस्ताव सादर करण्याबाबतचा ठराव
✔ संचालक मंडळाची यादी.
✔ घटनेतील उद्देशाची प्रत.
✔ मागील 3 वर्षाचे लेखापरिक्षण अहवाल
ब) वैयक्तिक लाभार्थीसाठी अशी कागदपत्रे सादर करावेत
✔ विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावा.
✔ लाभार्थीकडे पशुधन असल्याबाबतचे नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र

संपर्क कार्यालयाचे नाव : आपल्या जिल्हयाचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

santsahitya.in

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

3 thoughts on “विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्राचे वापराकरीता अनुदान”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *