Search
Generic filters

Kapus Bhav : कापसाला विक्रमी दर मात्र, उत्पादनात निम्म्यानेच घट!

Kapus Bhav : कापसाला विक्रमी दर मात्र, उत्पादनात निम्म्यानेच घट!

Kapus Bhav : कापसाला विक्रमी दर मात्र, उत्पादनात निम्म्यानेच घट!

 

सध्या कापसाच्या वाढत्या दराची मोठी चर्चा रंगलेली आहे. 10 हजार रुपये क्विंटल दर मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. खरिपात कोणत्याच पिकाला हा विक्रमी दर मिळालेला नाही. मात्र, दुसरीकडे कापसाच्या उत्पादनात निम्म्यानच घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे परिश्रम, उत्पन्नावर झालेला खर्च यामुळे अधिकचा नफा झाला नसला तरी जेवढे जमिनीत गाढले तेवढे का होईना पदरी पडले अशीच शेतकऱ्यांची भावना झाली आहे. मराठवाड्यात कापसाची उत्पादकता एकरी 6 ते 7 क्विंटलची आहे मात्र, यंदा तीन वेचण्या झाल्या तरी 3 क्विंटलपेक्षा अधिकचे उत्पादन मिळालेले नाही. त्यामुळे दर वाढल्याने दिलासा मिळालेला आहे पण उत्पन्नात वाढ अशी झालेली नाही.

कशामुळे घटले कापसाचे उत्पन्न?

मराठवाड्यात कापूस हे खरीप हंगामातील मुख्य पीक होते. मात्र, काळाच्या ओघात कापसाची जागा ही सोयाबीनने घेतली आहे. त्यामुले मुळात लागवड क्षेत्रामध्येच घट झाली होती. शिवाय कापसाला बोंड लागल्यानंतर झालेल्या पावसामध्ये या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होत. बोंडगळती आणि पावसामुळे बोंड ही बहरलीच नाहीत. एवढेच नाही कापूस वेचणीच्या दरम्यान, बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे उत्पादनावर निम्म्यानेच परिणाम झाला होता. फरदड उत्पादनामुळे शेत जमिनीचे आणि इतर पिकांचे नुकसान होते म्हणून शेतकऱ्यांनी तीन ते चार वेचण्या केल्या की कापूस काढणीवर भर दिला होता.

हे पण वाचा:- पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला नसेल तर असा करा अर्ज..!

कृषी विभागाच्या सर्वेक्षणात काय आले समोर

कापूस शेतामध्ये उभा असतानाच कृषी विभागाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या दरम्यान, कापसाच्या शेतामध्ये पावसाचे पाणी साचून राहिले होते. पाण्याचा योग्य वेळी निचराच झाला नाही परिणामी झाडे उन्मळून पडली व कापसाला आवश्यक असणारे जमिनीतील अन्नद्रव्यच मिळाली नसल्याने उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता तो आता खरा होताना पाहवयास मिळत आहे.

पुरवठा कमी मागणीत वाढ

कापसाचे दर वाढण्यामागे शेतकऱ्यांचीही महत्वाची भूमिका राहिलेली आहे. मध्यंतरी वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठेत मागणी कमी झाल्याचे भासविण्यात आले होते. या दरम्यान, शेतकऱ्यांनी मात्र, कापूस विक्रीपेक्षा साठवणूकीवरच भर दिला होता. अपेक्षित दर मिळत नाही तोपर्यंत कापसाची विक्री करायची नाही हा निर्धार शेतकऱ्यांनी केल्यामुळेच दरवाढ झाली आहे. पुरवठ्याअभावी प्रक्रिया उद्योगही निम्या क्षमतेने सुरु होते. त्यामुळेच महिन्यातच 8 हजारवार असलेला कापूस आज 10 हजार 200 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे विकला जात आहे.

source:- tv9 marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

1 thought on “Kapus Bhav : कापसाला विक्रमी दर मात्र, उत्पादनात निम्म्यानेच घट!”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *