Search
Generic filters

खरबूज लागवड माहिती

खरबूज लागवड माहिती

खरबूज लागवड माहिती

 

 

पिकाची माहिती

खरबूज  हे सर्व थरातील लोकांच्या पसंतीस उतरलेले वेलवर्गीय फळपीक असून वर्षभर जरी मागणी असली तरी उन्हाळ्यामध्ये मागणी मोठ्या प्रमाणात असते. कमी खर्चात, कमी पाण्यावर व ७० ते ९० दिवसांमध्येच येणारे मधुर, गोड, स्वादिष्ट अशा या वेलवर्गीय फळपिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. खरबूज लागवड माहिती Melon planting information

 

जमिनीचा प्रकार

मध्यम काळी पाण्याची निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते या पिकांकरता जमिनीचा सामू ५.५ ते ७ योग्य असतो

 

हवामान

मध्यम काळी पाण्याची निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते या पिकांकरता जमिनीचा सामू ५.५ ते ७ योग्य असतो

 

पिकाची जात

पुसा शरबती, हरा मधु, अर्का राजहंस, दुर्गापूर मधु, अर्का जीत

 

लागवड

खरबूजाची लागवड बिया टोकून करतात कारण त्यांची रोपे स्थलांतर सहन करू शकत नाहीत. या पिकांची लागवड खालील प्रकारे केली जाते.

१. आळे पद्धत – ठराविक अंतरावर आळेकरून त्यात शेणखत मिसळून मध्यभागी ३-४ बिया टोक्याव्यात.

२. सरी वरंबा पद्धत – खरबूजासाठी १ X ०.५ मीटर अंतरावर ३ ते ४ बिया टोकून लावाव्यात

३. रुंद गादी वाफ्यावर लागवड – या पद्धतीत लागवड रुंद गादीवाफ्याच्या दोन्ही बाजूंना करतात. त्यामुळे वेल गादी वाफ्यावर पसरतो व फळे पाण्याच्या संपर्कात न येत खरब होत नाहीत. यासाठी ३ ते ४ मी. अंतरावर सरी पडून सरीच्या बगलेत दोन्ही बाजूंना १ ते १.५ मी. अंतरावर ३ ते ४ बिया टोक्याव्यात.

खरबुजाची हेक्टरी १.५ ते २ किलो बियाणे पुरेसे असते. पेरणीपूर्वी प्रती किलो बियाणास ३ ग्रॅम थायरम चोळावे.

हे पण वाचा 

 

खत व्यवस्थापन

या पिकासाठी ५० किलो नत्र,५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश लागवडीपुर्व द्यावा व लागवडीनंतर १ महिन्यांनी ५० किलो नत्राचा दुसरा हफ्ता द्यावा.

 

पाणी व्यवस्थापन

जमिनीच्या मगदुरानुसार थंडीमध्ये ८ ते १२ दिवसांनी दुपारी ११ ते २ या वेळेत पाणी द्यावे व उन्हाळ्यामध्ये ५ ते ६ दिवसांच्या अंतराने सकाळी ९च्या आत पाणी द्यावे.

 

रोग नियंत्रण

भुरी – उपाय – डीनोकॅप किंवा कार्बेन्दँझिम हे औषध ९० लिटर पाण्यात १० ग्रॅम या प्रमाणत मिसळून फवारावे.नंतर दर १५ दिवसांनी २ ते ३ वेळा फवारवे. नंतर दर १५ दिवसांनी २ ते ३ वेळा फावरणी करावी.

केवडा – उपाय- डायथेन झेड -७८ ०.२% तीव्रतेची फवारणी करून हा रोग आटोक्यात आणता येईल.

मर – उपाय – हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. त्यामुळे पेरणीपुर्व १ किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम चोळावे.

फळमाशी – उपाय- कीड लागलेली व खाली पडलेली फळे नष्ट करावीत. पिकावर व जमिनीवर मेँलाँथीऑन या औषधाचा १ टक्का तीव्रतेचा फवारा मारावा.

मावा – उपाय- किड दिसल्यास मँलाँथीआँनहे औषध ०.१ टक्का या प्रमाणात फवारावे

 

उत्पादन

साधारणपाने ८० ते ९० दिवसांमध्ये फळे काढणीस येतात. खरबुज पिकल्यानंतर (तयार झाल्यावर ) मधुर वास येतो व फळाचा देठ सुकतो. खरबुजाचे साधारणत: १० ते १५ टन एकरी उत्पादन मिळते. खरबूज लागवड माहिती

 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या शेतकरी  मित्रांनो  

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

1 thought on “खरबूज लागवड माहिती”

Leave a Comment

Your email address will not be published.