Search
Generic filters

उत्पादनात घट मात्र, वाढत्या दराने ‘या’ खरिपातील पिकांना मिळतोय शेतकऱ्यांना ‘आधार’

उत्पादनात घट मात्र, वाढत्या दराने 'या' खरिपातील पिकांना मिळतोय शेतकऱ्यांना ‘आधार’

उत्पादनात घट मात्र, वाढत्या दराने ‘या’ खरिपातील पिकांना मिळतोय शेतकऱ्यांना ‘आधार’

 

खरिपातली पिकं वावरात असताना शेतकऱ्यांची चिंता कायम होती. कारण निसर्गाची अवकृपा अशी काय राहिली यंदा की अर्थार्जनाच्या दृष्टीने महत्वाचे असणरा  खरीप हंगामच पाण्यात होता. त्यामुळे उत्पादनात तर मोठी घट झाली होती. मराठावड्यात सोयाबीनची उत्पादकता ही एकरी 7 ते 8 क्विंटल असते यंदा मात्र, शेंगा लागल्यापासून हे पीक पाण्यातच राहल्याने उत्पादकता ही निम्म्यावरच आली होती.

शिवाय काढणी नंतर बाजारपेठेत सोयाबीन दाखल होताच दरात घट झाली. त्यामुळे सर्वकाही नुकसानीचेच असे मानले जात होते. जी अवस्था सोयाबीनची तीच कापूस आणि आता तूरीची होत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिका आणि बाजारपेठेचे बदललेले स्वरुप यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर या पिकांना अंतिम टप्प्यात का होईना चांगला दर मिळत आहे. शिवाय आवक प्रमाणात राहिली तर दरात अणखीन वाढ होणार असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी tv9 मराठी शी बोलताना सांगितले आहे.

काय आहेत सध्याचे दर?

खऱीप हंगामातील सोयाबीन, कापूस आणि आता तूरीची आवक सुरु झाली आहे. मात्र, सुरवातीच्या काळात या पिकांना कवडीमोल दर होते. सोयाबीनला मुहूर्ताचा दर मिळाला होता 11 हजार रुपये क्विंटल मात्र, हा दर काही दिवसांपूरताच होता. त्यानंतर सोयाबीन अनेक दिवस 4 हजार 500 रुपयांवर स्थिरावले होते.

दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात सुधारणा होत गेली ती आज 6 हजार 600 रुपये असा दर मिळत आहे. दुसरीकडे पांढऱ्या सोन्याला बाजारात दाखल झाल्यापासूनच चांगला दर आहे. मात्र, उत्पादनात मोठी घट झाली आहे. मध्यंतरी 7 हजार 500 रुपयांवर स्थिरावलेला कापसाने आज 10 हजारांचा टप्पा पार केला आहे.

पुरवठा कमी आणि मागणी अधिक यामुळे कापसाच्या दरात वाढ झालेली आहे. गेल्या आवठवड्याभरापासून खरीपातील अंतिम पिक असलेल्या तूरीची आवक सुरु झाली आहे. सुरवातीला हमी भाव केंद्र सुरु होण्यापूर्वी तुरीचे दर हे 6 हजारापर्यंतच होते. पण सध्या तूरीनेही 6 हजार 500 चा टप्पा ओलांडलेला आहे. त्यामुळे या तीन्हीही पिकांचे उत्पादन घटले असले तरी वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळालेला आहे.

हे पण वाचा:- आता शेतकरी उत्पादक कंपन्याही करणार तूरीची खरेदी, नेमका फायदा काय?

शेतकऱ्यांची भूमिका ठरली निर्णायक

दरवर्षी खरिपातील पिकांची काढणी झाली की थेट बाजारपेठेत विक्री हे शेतकऱ्यांचे ठरलेलं. यंदा मात्र, बाजारपेठेचे गणितच शेतकऱ्यांना समजलेले होते. शेती मालाला योग्य दर मिळाला तरच विक्री अन्यथा साठवणूक अशी भूमिका संपूर्ण हंगामात घेतली होती. केवळ सोयाबीनसाठीच नाही तर कापूस आणि आता तूरीसाठीही हेच एकक लावले जात आहे. उत्पादनात घट होऊनही वाढीव भाव कसा नाही असा सवाल शेतकऱ्यांना होता. त्यामुळेच अपेक्षित दर मिळत नाही तोपर्यंत धान्याची साठवणूक करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता. त्यामुळे अजूनही निम्मे सोयाबीन शेतकऱ्यांकडेच आहे. हा प्रयोग शेतकऱ्यांनी केल्यामुळेच सोयाबीन आणि कापसाचे दर वाढले आहेत. तूरीची आवक गेल्या आठवड्यापासून सुरु झाली आहे. सुरवातीलाच हमीभावापेक्षा अधिकचे दर तुरीला खुल्या बाजारपेठेत मिळू लागले आहेत. त्यामुळे सोयाबीन आणि कापसाप्रमाणेच शेतकऱ्यांनी तुरीबाबतही निर्णय घेतला तर फायद्याचे राहणार असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.

source:- tv9 marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *