Search
Generic filters

केंद्र सरकार सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देणार, अर्ज करा आणि लाभ मिळवा!

केंद्र सरकार सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देणार, अर्ज करा आणि लाभ मिळवा!

केंद्र सरकार सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देणार, अर्ज करा आणि लाभ मिळवा!

जर तुम्हीही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घेऊ शकते. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या माहितीनुसार सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) दिले जाणार आहे. ते म्हणाले की, साथीच्या काळातही शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड प्रदान केले गेलेत. सर्व शेतकऱ्यांना केसीसी अंतर्गत आणण्यासाठी सरकार गेल्या वर्षापासून मोहीम राबवत आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, केंद्रीय योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे आणि पैशांची कमतरता अडथळा बनू नये. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांना स्वस्तात कर्ज मिळते

आता केसीसी फक्त शेतीपुरते मर्यादित नाही. पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन या अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. किसान क्रेडिट कार्डद्वारे सरकार शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते. कर्जावरील व्याज 9 टक्के असले तरी त्याला सरकारकडून 2% सबसिडी मिळते. यासह कर्जावर फक्त 7 टक्के व्याज भरावे लागते.

हे पण वाचा:- पंजाब डख हवामान अंदाज : ‘या’ तारखे पासून राज्यात पून्हा पावसाला सुरवात होइल!

KCC कोण घेऊ शकतो?

शेती, मत्स्यपालन आणि पशुपालनाशी संबंधित कोणतीही व्यक्ती, जरी त्याने दुसऱ्याच्या जमिनीवर शेती केली, तरी याचा लाभ घेऊ शकतो. किमान वय 18 वर्षे आणि कमाल 75 वर्षे असावे. जर शेतकऱ्याचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर सह-अर्जदार देखील आवश्यक असेल. ज्यांचे वय 60 पेक्षा कमी आहे. शेतकऱ्याचा फॉर्म भरल्यानंतर बँक कर्मचारी तुम्हाला पात्र आहे की नाही हे पाहतील.

किसान क्रेडिट कार्ड मिळवण्याची प्रक्रिया

KCC मिळवणे सोपे आहे, यासाठी आधी https://pmkisan.gov.in/ या अधिकृत साईटवर जा आणि इथून किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाऊनलोड करा. तुम्हाला हा फॉर्म तुमच्या जमिनीची कागदपत्रे, पीक तपशीलांसह भरावा लागेल. येथे तुम्हाला हे सांगावे लागेल की तुम्ही इतर कोणत्याही बँक किंवा शाखेतून इतर कोणतेही किसान क्रेडिट कार्ड बनवले नाही. यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा, त्यानंतर तुम्हाला संबंधित बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड मिळेल.

KCC साठी आवश्यक कागदपत्रे

ओळखपत्रासाठी, तुमच्याकडे मतदार ओळखपत्र / पॅन कार्ड / पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मतदार ओळखपत्र / पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स हे अॅड्रेस प्रूफ म्हणून पाहिले जाते.

source:- tv9 marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published.