Search
Generic filters

किसान क्रेडिट कार्ड या केंद्र सरकारच्या योजनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक सहभाग, असे काढा किसान क्रेडीट कार्ड

किसान क्रेडिट कार्ड या केंद्र सरकारच्या योजनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक सहभाग, असे काढा किसान क्रेडीट कार्ड

 

सर्वसामान्य शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळावा हा उद्देश केंद्र सरकारचा आहे. त्याच अनुशंगाने प्रयत्नही केले जात आहे. विशेषत: मोदी सरकारने  किसान क्रेडीट कार्डवर अधिकचा भर दिलेला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना सावकराकडून कर्ज घेण्याची वेळ येत नाही. शेती व्यवसयाशी या योजनेचा लाभ मिळण्याची तरतूद तर आहेच पण आता पशूपालक आणि मासे उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरु आहे. मार्च 2020 ते 12 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये देशभरात 2 कोटी 60 लाख 59 हजार 687 शेतकऱ्यांनी हे उपयोगी कार्ड काढलेले आहे. यामध्ये सर्वाधिक 39 लाख 49 हजार 144 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे. त्यानंतर राजस्थान, उत्तरप्रदेश आणि आंध्रप्रदेश येथील शेतकऱ्यांनी हे उपयोगी कार्ड काढलेले आहे.

कमी व्याजदरात अधिकचे कर्ज

शेती व्यवसयात गुंतवणूक करण्यासाठी गरज असते ती पैशाची. मात्र, हीच गरज भागली जात नाही म्हणून केंद्र सरकारने कमी व्याजदरात अधिकचे कर्ज मिळावे अशी सोय केली आहे. यामध्ये जर शेतकऱ्यांनी अद्यापही भाग घेतला नसला तरी त्यांना फक्त जवळच्या सहकारी किंवा सरकारी बॅंकेत जाऊन अर्ज करायचा आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेलाच हे केसीसी जोडले गेले आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सोपी झालेली आहे. ‘किसान सन्मान निधी’ ज्या बॅंकेत तुमचा जमा होतो तेथेच याचादेखील अर्ज मिळणार आहे. तो अर्ज भरुन बॅंकेत जमा करावा लागणार आहे. त्याकरिता काही कागदपत्रांची देखील आवश्यकता आहे.

आवश्यक कागदपत्रे

– बॅंकेतून घेतलेला अर्ज पूर्ण भरावा लागणार आहे. त्यासोबत ओळख प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. यामध्ये मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड यापैकी कोणतेही असले तरी अर्ज दाखल करता येणार आहे. तर इतर कोणत्याही बँकेत कर्जदार नाहीत असे प्रतिज्ञापत्र म्हणजेच NO Dues चे प्रमाणपत्र. व अर्जदाराचा फोटो ही कागदपत्रे लागणार आहेत.

हे पण वाचा:- पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता आला, अशी पहा गावातील शेतकऱ्यांची यादी !

कोण पात्र आहे, अर्ज कुठे असेल

– शेती करणारे किंवा सामूहिक शेती करणारे दोन्ही वैयक्तिक शेतकरी त्यासाठी पात्र आहेत.
– बटईने शेती करणारे आणि बचत गटाच्या माध्यमातून शेती करणारे केसीसी योजनेचा लाभ घेऊ शकतात.
– सर्व सरकारी, खासगी, सहकारी आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये हे केसीसी तयार केले जाणार आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.
– शेतकरी आपले सुविधा केंद्र (CSC) या ठिकाणी देखली अर्ज करु शकतात.
– पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसायासाठी दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे.
– केसीसी कार्डधारकांना शेतीसाठी कर्जाची मर्यादा तीन लाख रुपये आहे.

फक्त 15 दिवसांच्या आत होणार कार्डची प्रक्रिया

आवश्यक दस्तऐवजासह अर्ज स्वीकारल्यानंतर बँक व्यवस्थापनाला 15 दिवसांच्या आत केसीसी तयार करावे लागणार आहे. कृषी मंत्रालयाने बॅंकांना तसे निर्देश दिले आहेत. एवढेच नाही तर याकरिता कोणतेही शुल्क आकारता येणार नाही. शिवाय अर्ज दाखल करण्यापासून लाभार्थ्याच्या हातामध्ये पडेपर्यंत बॅंकांची जबाबदारी राहणार आहे. यापूर्वी 4 ते 5 हजार रुपये घेतले जात होते. एसबीआय (SBI), पीएनबी (PNB), एचडीएफसी (HDFC) आणि आयसीआयसीआय (ICICI) सह सर्व बँका केसीसी तयार करतात.

व्याज किती घेतो?

किसान क्रेडिट कार्डवर घेतलेल्या रकमेवरील व्याजदर 9 टक्के व्याज आहे. यामध्ये सरकार 2 टक्के सवलत देते. जो वेळेवर पैसे परत करतो त्याला आणखी 3 टक्के सूट मिळते. अशा प्रकारे केवळ शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी केवळ 4 टक्के व्याज राहते.

source:- Tv9 marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व