Search
Generic filters

शेतकरी सन्मान निधी योजना

शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यावर पोहोचले नाहीत? येथे करा तक्रार

केंद्रसरकारने नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा दुसरा टप्पा सरकारने सुरू केला आहे. या योजनेत सरकारने देशातील 6 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये जमा केले आहेत.

परंतू, जर या योजनेंतर्गत एखाद्या शेतकऱ्यास पैसे मिळाले नसतील तर काळजी करण्याची गरज नाही, कारण आता केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे याबाबत तक्रार दाखल करू शकतो. केंद्र सरकारने सुरू केलेल्या शेतकऱ्यांशी संबंधित ही सर्वात मोठी योजना आहे आणि प्रत्येक खऱ्या शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळावा यासाठी शासनाचा प्रयत्न आहे जेणेकरून शेतीतील समस्या सोडवण्यासाठी याचा उपयोग होइल.

अशी करा तक्रार
जर आपणास 2000 रुपये मिळाले नसतील तर आपण सर्व प्रथम, आपल्याला आपल्या क्षेत्रातील लेखापाल आणि कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांना त्याबद्दल माहिती द्यावी लागेल. जर हे लोक आपले म्हणणे ऐकत नसतील तर आपण त्यासंबंधित हेल्पलाइनवर देखील कॉल करून आपली तक्रार देऊ शकतो.

तक्रार दाखल करण्याकरता सोमवार ते शुक्रवार या काळात पंतप्रधान-किसान हेल्प डेस्कवर ईमेलद्वारे
pmkisan-ict@gov.in वर संपर्क साधावा किंवा सेलच्या 011-23381092 (डायरेक्ट हेल्पलाइन) वर फोन करुन मदत घेऊ शकता. तसेच आपण या योजनेच्या शेतकरी कल्याण विभागात संपर्क साधू शकता. दिल्लीतील त्याचा फोन नंबर 011-23382401 आहे, तसेच ईमेल आयडीद्वारे (pmkisan-hqrs@gov.in) संपर्क करु शकता. शेतकरी सन्मान निधी

Ref:- agrowonegram

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

1 thought on “शेतकरी सन्मान निधी योजना”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व