लाजाळू वनस्पती चे फायदे

लाजाळू वनस्पती चे फायदे

लाजाळू वनस्पती चे फायदे

 

krushi kranti : पूर्वी गावाच्या सभोवताल अनेक औषधी वनस्पती असायच्या. या औषधी वनस्पतींच्या वापराने अनेक छोटे-मोठे आजार पटकन बरे व्हायचे. त्यातीलच एक लाजाळू. अतिशय नाजूक असलेल्या लाजाळूच्या रोपट्याला हात लावलं की ते आपोआपच पाने मिटवून घेते. त्यामुळेच या वनस्पतीची लाजाळू’ अशी ओळख आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत प्रदूषण, मानवी हस्तक्षेपामुळे “लाजाळू’ कोमेजली असून ही औषधी वनस्पती दुर्मिळ होत चालली आहे.

काही वर्षांपूर्वी गावाशेजारी, शेताच्या परिसरात लाजाळू, सांढेवाल, खंडूचक्का, अक्कल काढा, मंजिष्ठा यासह अन्य औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळून येत होत्या. या औषधी वनस्पतींचा उपयोग छोट्या-मोठ्या व्याधींवर केला जायचा. या औषधी वनस्पतींचे गुण लक्षात त्यांच्याकडून नागरिकही याचे संवर्धन करीत होते. मात्र, गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलले आहे.

लाजाळूसह अन्य औषधी वनस्पती दुर्मिळ होत चालल्याचे आयुर्वेदतज्ज्ञांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात शेत असलेल्या जागेवर आता फ्लॉट पडले. शेतीच्या जागी आता मोठ-मोठ्या इमारती बनल्या. वृक्षांची कत्तल मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असल्याने पर्यावरणाचा समतोलही बिघडत चालला आहे. उद्योगांमुळे प्रदूषण वाढले. या सर्व घटकांमुळे लाजाळू व अन्य औषधी वनस्पती दुर्मिळ होत चालल्या आहेत.

हे पण वाचा:- आरोग्यासाठी चांगले असलेलं ड्रॅगन फ्रुट

ह्या वनस्पतींच्या पानांस स्पर्श केल्यास दले व दलके एकमेकांवर पडून मिटतात व शेवटी सर्वच पान सैलपणे लोंबू लागते; कारण दलकाच्या फुगीर तळभागातील पातळ भित्ती असलेल्या पेशींतील पाण्याचा अंश कोणत्या तरी कारणाने कमी होतो. परिणामी या पेशी लुळ्या पडून दलके मिटली जातात आणि पाने खाली वाकतात. त्याचे मूळ स्वरूप बदलते; या हालचालीने स्पर्श करणाऱ्या वस्तु-व्यक्तीपासून त्याचे संरक्षण होते. स्पर्शाचा परिणाम जसजसा कमी होत जातो, तसतसे ते पान पूर्ववत होत जाते. तीव्र प्रकाशात व अंधारात अशीच प्रतिक्रिया होते.

एका पानास दिलेले उत्तेजन दुसऱ्या पानाकडे देठ व खोड यांमधून नेले जाते व इतर पानेही मिटतात. या हालचालीचा विशेष प्रायोगिक अभ्यास सर जगदीशचंद्र बोस .यांनी केला होता व वनस्पती कमीअधिक प्रमाणात संवेदनक्षम असतात व प्राण्यांप्रमाणे त्या प्रतिसाद देतात, असे सिद्ध केले. प्राण्यांशी तुलना करता येईल असे सूक्ष्म व पूर्ण विकास न पावलेले तंत्रिका तंत्र वनस्पतीत असल्याचा हा पुरावा आहे.

लाजाळू वनस्पतीचे फायदे (The benefits of shy plants)

  • लाजालू हे थंड गुणांनी समृध्द असून त्याच्या सेवनाने कफ आणि पित्त या आजारांवर गुणकारी आहे.
  • तुम्हाला मूळव्याधीचा त्रास असेल तर तुम्ही याच्या पांनाची पावडर दुधासोबत घ्या.
  • मुतखडा किंवा अन्य कोणतेही मुत्र विकार असतील तर तुम्ही याच्या मुळांचा काढा करून प्या.
  • खोकला येत असेल तर या झाडाची पाने किंवा मुळ चाऊन खा आराम मिळतो.
  • जखम झाली असेल आणि रक्त थांबत नसेल तर अशा वेळी या झाडाची पाने वाटून ही पेस्ट जखमेवर लावा रक्त थांबते.

अशी भरपूर झाडे वनस्पती आपल्या आजूबाजूला आहेत त्यांचा उपयोग आपल्याला माहीत नाही पण ह्या वनस्पती खरोखर खूप उपयोगी आहेत त्यामुळे त्या काढून फेकु नका त्यांचा उपयोग जाणून घा.

टीप:- डॉक्टर च्या सल्ल्यानुसार उपचार करावा 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *