Search
Generic filters

Maharashtra Agriculture Budget : महाविकास आघाडीच्या बजेटमधून शेतकऱ्यांसाठी काय?

Maharashtra Agriculture Budget

Maharashtra Agriculture Budget : महाविकास आघाडीच्या बजेटमधून शेतकऱ्यांसाठी काय?

 

महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. महाविकास आघाडीच्या तिसऱ्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या.

भूविकास बँकांचे 34 हजार 788 कर्जदारांकडे असणारे 964 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची मोठी घोषणा अजित पवार यांनी केली. तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत काही बदल करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यामध्ये जर बदल केले नाहीत, तर शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी अन्य पर्यायांचा विचार करेल असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.

अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा:

 1. हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारण्याची घोषणा अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली आहे.
 2. शेतकरी कल्याणासाठी अधिक अनुदान देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 3. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजारांऐवजी 75 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.
 4. दोन वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. त्याशिवाय गोसीखुर्द प्रकल्पासाठीच्या कामासाठी निधीची तरतूद करण्यात आली.
 5. कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला 50 कोटींचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली.
 6. पंतप्रधान सिंचन योजनेतून 11 प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
 7. जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटी रुपयांच्या निधीची तरतदू यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
 8. भरड धान्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
 9. शेततळ्यासाठीच्या अनुदानात वाढ करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
 10. देशी गाई, बैलांची उत्पादकता वाढवण्यासाठी राज्यात तीन मोबाइल प्रयोगशाळा उभारणार
 11. प्रत्येक महसूल विभागात प्रत्येकी एक शेळी प्रकल्प
 12. या वर्षात 60 हजार कृषीपंपाना वीज देणार
 13. एक लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागा उभारण्याचे लक्ष्यं
 14. मुंबईतील पशूवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी

source:- ABP majha

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

2 thoughts on “Maharashtra Agriculture Budget : महाविकास आघाडीच्या बजेटमधून शेतकऱ्यांसाठी काय?”

 1. माननीय अजित दादा आणि महाराष्ट्राचे सगळे शेतकरी बंधू नमस्कार मागच्या वर्षी 150000/- पर्यन्त माफी दिली होती परंतु काही शेतकरी अजून त्याच्यापासून वंचित आहेत त्यांचे काय होणार कारण त्यांना नवीन पीककर्ज मिळत नाही तसेच त्यांना पीकविमा काढता येत नाही थकबाकीमुळे कृपया उत्तर मिळेल तर समाधान होईल.

Leave a Comment

Your email address will not be published.