Maharashtra Weather Report : रत्नागिरी सिंधुदुर्गात १०० मिमी पेक्षा जास्त पाऊस, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला रेड अलर्ट

Maharashtra Weather Report : रत्नागिरी सिंधुदुर्गात १०० मिमी पेक्षा जास्त पाऊस, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला रेड अलर्ट

Maharashtra Weather Report : रत्नागिरी सिंधुदुर्गात १०० मिमी पेक्षा जास्त पाऊस, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला रेड अलर्ट

 

राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होईल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, वाशिम आणि वसई विरारमध्ये पावसानं हजेरी लावली आहे.

मुंबई: महाराष्ट्रात पावासाला पुन्हा सुरुवात आहे. भारतीय हवामान विभागानं राज्यातील पुढील तीन दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जारी केला आहे. 17 जुलैपर्यंत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होईल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, वाशिम आणि वसई विरारमध्ये पावसानं हजेरी लावली आहे.

रत्नागिरीत 104 मिलिमीटर पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात अतिवृष्टी झालीय. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात 104 मिलिमीटर पाऊस झाला आहे. मंडणगड, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर या चार तालुक्यात शंभर मिलिमीटर हून अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यात संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यात 150 मिलिमीटर हून अधिक पाऊस झाला आहे. रत्नगिरी तालुक्यातील बाव नदी इशारा पातळी बाहेर वहात आहे.

हे वाचा:- पीएम किसान सम्मान निधि : ‘या’ तारखेला येणार ९ व्या हप्त्याची रक्कम, वाचा सविस्तर!

सिंधुदुर्गमध्ये 109 मिमी पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पाऊस सुरूच.अधून मधून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेतय मागील २4 तासात जिल्ह्यात सरासरी 109 मिमी पाऊस पडला आहे. तीन दिवसात जिल्ह्यात सरासरी 371मिमी पावसाची नोंद झालीय. मागील चोविस तासात जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस मालवण व दोडामार्ग तालुक्यात लागला.मालवण मध्ये 157 तर दोडामार्ग मध्ये 150 मिमी पाऊस पडला.तर, सर्वात कमी पाऊस 65 मिमी देवगड तालुक्यात लागला आहे.

जालना घनसावंगी दरम्यान पूल वाहून गेला

जालना जिल्ह्यातील अंबड घनसावंगी तालुक्यात जोरदार पाऊस झाला आणि या पावसामुळे अंबड ते घनसावंगी रस्त्यावरील पुल वाहून गेल्याने अनेक गावचा संपर्क तुटला आहे. ढालसखेडा जवळील हा पुल वाहून गेल्याने तिर्थपुरी घनसावंगी सह शेकडो गावाचा संपर्क तुटला आहे. जालना जिल्ह्यात काल पासुन काही भागात चांगला पाऊस झाला आहे.

वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

वाशिम जिल्ह्यात सततच्या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून शेतात पाणी साचल्याने शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे.

वसई विरार

वसई विरार मध्ये सकाळ पासून अधून मधून रिमझिम पावसाच्या हलक्या सरी येत आहेत. मागच्या 24 तासात वसई ताल्युक्यात 56 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अचानक भरलेले आभाळ आणि मध्येच पडलेले ऊन या ऊन सावलीच्या खेळात पाऊस सुरू आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागानं राज्यात 17 जुलैपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर, पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं देखील हवामान विभागामार्फत कळवण्यात आलं आहे.

14 जुलै रोजी राज्यात पावसाची काय स्थिती

हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर, पुणे जिल्ह्याला रेड अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर सिंधुदुर्ग ठाणे, पालघर, मुंबई आणि धुळेला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर जालना, औरंगाबाद लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली, यवतमाळ, अकोला, वाशिम अमरावती, वर्धा आणि चंद्रपूरला येलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. अहमदनगर, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली लातूर, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात हलका पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

संदर्भ:- TV9 Marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व