संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा पुढचे 3 दिवस धोक्याचे, मुंबईसह नवी मुंबईत मुसळधार

संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा पुढचे 3 दिवस धोक्याचे, मुंबईसह नवी मुंबईत मुसळधार

 

हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे

 

मुंबई शहरासह पश्चिम उपनगरात पहाटेपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तुफान बॅटींग करणाऱ्या पावसाने मुंबईसह ठिकठिकाणी हजेरी लावली. यामुळे मुंबईतील हिंदमाता, परेल, सायन, किंग्ज सर्कल यासारख्या सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

 

मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस

मुंबईसह पश्चिम उपनगरात पहाटेपासून पावसाची संततधार पाहायला मिळत आहेत. मुंबईतील दादर, वरळी, लोअर परेल, मरिन ड्राईव्ह यासारख्या अनेक ठिकाणी पाऊस दिसत आहे. तर मुंबईच्या पश्चिम उपनगरात अंधेरी, बोरिवली, कांदिवली या ठिकाणीही मुसळधार पाऊस कोसळत आहे. पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले आहे.

मुंबईतील हिंदमाता, परेल, सायन, किंग्ज सर्कल या सखल भागात नेहमीप्रमाणे पाणी साचले आहे. तर मुंबईच्या पश्चिम उपनगरात अंधेरी सबवे हा सखल भाग असल्यामुळे तिथे दोन ते तीन फूट पाणी साचले आहे. त्यामुळे अंधेरी सबवे वाहनांसाठी आणि नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

 

संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

दरम्यान पुढचे 3 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन दिवसात कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मुंबई, ठाण्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याशिवाय नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये यलो अलर्ट घोषित केला आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

नवी मुंबईतही मुसळधार पाऊस

नवी मुंबईतही पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रात्री नवी मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, पहाटे पावसाचा जोर पुन्हा वाढला. त्यामुळे नवी मुंबईत पावसासह सर्वत्र धुके पसरलं आहे. नवी मुंबई, पनवेलमधील काही शहरात तुरळक पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

कोकणासह पुण्यात पावसाची विश्रांती  

एकीकडे मुंबई, नवी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर दुसरीकडे कोकण आणि पुण्यात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची एक सरही पडलेली नाही. आकाशात काळे ढग नसल्यामुळे सूर्यदर्शनही होत आहे. तर रायगड जिल्ह्यातही सध्या कुठेच फारसा पाऊस नाही. सावित्री, कुडंलिका, आबां, पातळगंगा, गाढी, उल्हास सर्व प्रमुख नद्या इशारा पातळीपेक्षा कमीने वाहत आहेत.

संदर्भ:- tv9 marathi

——————————————————————————————————————————————–

हे पण वाचा:- पीएम किसान सन्मान योजनेचे ३० महिने पूर्ण, ९ वा हप्ता लवकरच सुरु-वाचा सविस्तर

हे पण वाचा:- खरिप हंगामासाठी किमान आधारभूत किमती जाहीर ‘MSP’ कोणत्या पिकांची सर्वाधिक वाढली ? वाचा सविस्तर

——————————————————————————————————————————————–

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची माहिती मोफत मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व