Mahatma jotirao phule karj mukti yojana : ‘हे’ काम करा तरच मिळणार कर्जमाफीचा लाभ, शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी!

Mahatma jotirao phule karj mukti yojana : 'हे' काम करा तरच मिळणार कर्जमाफीचा लाभ, शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी!

Mahatma jotirao phule karj mukti yojana : ‘हे’ काम करा तरच मिळणार कर्जमाफीचा लाभ, शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी!

 

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तीला (Karjmafi) दोन वर्ष उलटली तरी अनेक शेतकऱ्यांना (farmers) याचा लाभ मिळालेला नाही. यासंबंधी वेगवेगळी कारणे आहेत. (State Government) राज्य सरकारकडे पैसा नसल्याने शेतकरी वंचित आहेत तर काही शेतकऱ्यांनी आपल्या खात्याला आधार प्रमाणीकरण केले नसल्याने लाभ मिळालेला नाही.

या दोन्ही कारणांमुळे प्रत्येक जिल्ह्यात हजारोंवर शेतकरी आहेत जे कर्जमुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, आता 15 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना आधार हे लिंक करावे लागणार अन्यथा कर्जमुक्तीला मुकावे लागणार आहे.

यासंबंधी एक मोहिम राबवली जाणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा आहे. आधार लिंकबरोबरच तक्रार निवारणङी केले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे शेतकरी हे कर्जमुक्तीपासून वंचिंत राहिलेले आहेत. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारची स्थापना होताच या कर्जमुक्तीची घोषणा करण्यात आली होती. तील लाखापर्य़ंत थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी तर चालू बाकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार असे स्वरुप होते पण ही आश्वासने हवेतच राहिल्याने आधार लिंक केले तर काय फायदा होणाक का असा सवालही उपस्थित होत आहे.

आधार नोंदणीचीही अडचण

योजनेत पात्र होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ही बॅंकेत जमा करणे आवश्यक होते. मात्र, नांदेड जिल्ह्यातील तब्बल 5 हजार 802 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. शासनाने निधीची पुर्तता करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. नांदेड जिल्ह्यातील 2 लाख 14 हजार 491 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. यासाठी 1461 कोटी 36 लाख रुपये निधी अपेक्षीत होता. यापैकी दोन लाख 12 हजार 759 शेतकऱ्यांची कर्जखाती आधार लिंक केली आहेत. तर पोर्टलवर दोन लाख नऊ हजार 99 कर्जखाती अपलोड केली आहेत.

हे पण वाचा:- E pik pahani : ई-पीक पाहणी नाही केल्यावर काय होणार ? मुदतीमध्ये आणखीन वाढ

नियमित व्याज अदा करुनही शेतकऱ्यांची निराशाच

थकीत शेतकऱ्यांना संपूर्ण पीक कर्जमाफी तर नियमित व्याज अदा करुन चालूमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार देणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना ही रक्कम मिळालेली नसल्याने शेतकरी आता व्याज न अदा करता थकीत राहण्यातच समाधान मागत आहेत. प्रोत्साहनपर 50 हजार रुपये हे शासनाचे धोरण आहे. मात्र, अद्यापर्यंत याअनुशंगाने राज्य सरकारने निधी हा बॅंकेत जमा केला नसल्याने शेतकऱ्य़ांना नियमित व्याज हे भरावेच लागणार असल्याचे बॅंकाकडून सांगितले जात आहे.

हे पण वाचा:- पीएम किसान योजना : दोन हप्ते मिळवण्यासाठी 31 ऑक्टोबरपूर्वी करा ‘हे’ काम!

येथे करा आधार प्रमाणीकरण

आधार प्रमाणीकरण करण्यासोबतच जिल्हास्तरीय तक्रारी निकारण्यासाठी तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात व बॅंकेशी संपर्क करावा लागणार आहे.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

source:- tv9 marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *