शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सून महाराष्ट्रात दाखल !

हवामान

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सून महाराष्ट्रात दाखल !

 

शेतीची मशागत करुन पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय.

शेतीची मशागत करुन पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय. हवामान खात्यानं याची घोषणा केलीय. त्यामुळे शेतीत पेरणी करुन मान्सूनच्या पावसावर पिक फुलवण्यासाठी शेतकऱ्यांची तगमग वाढणार आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यानं कोकणातील हर्रे परिसरात प्रवेश केलाय. सोलापूर मराठवाड्याच्या संलग्न भागात मान्सून दाखल झालाय

हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी के. एस. होसाळकर यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. ते म्हणाले, “मान्सूनविषयी चांगली बातमी आहे. आज (5 जून) मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मान्सून रेषा राज्यात दक्षिण कोकणात हर्णेपर्यंत, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सोलापूरपर्यंत आणि मराठवाड्यात काही संलग्न भागात पोहचलाय. सध्याची परिस्थिती मान्सूनच्या पुढच्या वाटचालीसाठी अनुकुल आहे.”

राज्यात शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग

पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांची शेतीच्या कामांची चांगलीच लगबग सुरू असते. पहिल्या पावसाच्या आधीच शेतं नागंरून पेरणीसाठी ते तयार असतात. त्यातच आता मान्सून दाखल झाल्यानं शेतकऱ्यांकडून शेती कामाला वेग आलेला दिसत आहे. पहिल्या दमदार पावसानंतर लगेचच पेरणीची कामं सुरू होतील. त्यामुळे एकूणच शेतकऱ्यांकडून मान्सूनच्या सुरुवातीपासून शाश्वत पाऊस पडो, अशीच इच्छा व्यक्त केली जातेय.

अंदाजानुसार मान्सून आज‌ महाराष्ट्रात दाखल झाला.मान्सून रेषा राज्यात, द.कोकणात हर्णे पर्यंत आहे. तसेच द.मध्य महाराष्ट्रात सोलापूर , मराठवाडा आणि काही सलग्न भागात मान्सूनच्या जोरदार सारी बरसतील. तसेच मान्सूनच्या पुढच्या वाटचालीसाठीदेखील अनुकुल वातावरण आहे

——————————————————————————————————————————————–

हे पण वाचा:- केंद्रीय कृषी मंत्रालयाचा निर्णय भारतातील शेतकऱ्यांना ‘यूनिक किसान आयडी’ क्रमांक मिळणार

हे पण वाचा:- “कुक्कुटपालन पावसाळ्यातील-व्यवस्थापन”

——————————————————————————————————————————————–

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची माहिती मोफत मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व