Search
Generic filters

मिरची पिकावरील रोग व उपाय 2021

मिरची पिकावरील रोग व उपाय 2021

मिरची पिकावरील रोग व उपाय 2021

 

krushi kranti : मिरची पिकामध्ये मुख्यत्वे मर, डायबॅक, सरकोस्पोरा पानावरील विषाणुजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यावर योग्य उपाययोजना केल्यास प्रभावी नियंत्रण होऊ शकते.

रोपातील मर

मिरची रोपवाटिकेमध्ये बीज लागवडीनंतर दुस-या आठवड्यापासून पाचव्या आठवड्यापर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. नुकसानग्रस्त रोपाचा जमिनीलगतचा भाग मऊ पडून रोपे कोलमडतात व मरतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी खालील उपाय करावेत.

  1. रोपवाटिका उंच गादीवाफ्यावर केल्याने पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होऊन बुरशीची वाढ रोखण्यास मदत होईल. एकरी लागवडीकरिता ६५० ग्रॅम बियाणे वापरावे. दाट लागवड केल्यास या रोगाचा प्रादुर्भाव अधिक होतो.
  2. मॅन्कोझेब तीन ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. कॉपर ऑक्झिक्लोराइड ३o ग्रॅम प्रति १o लिटर प्रमाणे बियाणे लागवडीपासून दुस-या आठवड्यात व तिस-या आठवड्यातवाफ्यावर ड्रेचिंग करावी. मिरची पिकावरील रोग व उपाय
  • माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.

डायबँक आणि फळ सडणे

हा रोग कोरडवाहू तसेच ओलिताखालील अशा दोन्ही मिरची पिकांमध्ये आढळून येतो. या रोगाचा प्रसार बियाण्याद्वारे तसेच हवेद्वारे होऊन पिकाची फांदी शेंड्याकडून खालच्या दिशेने वाळत येते. नुकसानग्रस्त फांदीची साल प्रथम करड्या रंगाची होऊन फांदीवर घट्ट काळ्या रंगाचे ठिपके आढळतात. पक्र झालेल्या फळावर गोलाकार किंवा अंडाकृती काळे ठिपके आढळतात. नुकसानग्रस्त फळे सुकतात आणि वाळतात.

नियंत्रण

  1. हा रोग बियाण्यापासून होत असल्यामुळे रोगमुक्त बियाण्याचाच वापर करावा. मॅन्कोझेब तीन ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
  2. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी रोगग्रस्त फांद्या गोळा करून जाळून टाकाव्यात. बुरशीजन्य रोग आढळून आल्यानंतर २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा ३o ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड १o लिटर पाण्यात घेऊन गरजेनुसार नियंत्रित फवारण्या घ्याव्यात.

पानांवरील ठिपका

साधारणतः ऑक्टोबर ते फेब्रुवारी या महिन्यांत रोगाचा प्रादुर्भाव पानावर करड्या रंगाच्या लहान ठिपक्यांच्या स्वरूपात आढळून येतो. काही कालावधीनंतर या ठिपक्यांचा रंग बदलून पांढुरका रंग पानाच्या मध्यभागी आढळतो. तसेच, पानाच्या कडेला गर्द करडा रंग असतो. या रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्यास पाने भरपूर प्रमाणात पिवळी पडून गळून जातात. नियंत्रण : १० ग्रॅम काबॅन्डाझिम किंवा २५ ग्रॅम मॅन्कोझेब हे बुरशीनाशक प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

जिवाणुजन्य पानांवरील ठिपके

या रोगाचा प्रादुर्भाव ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यात आढळून येतो. रोगामुळे पाने, खोड व फळांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते. सुरवातीला लाल करड्या रंगाचा ठिपका नंतर काळ्या मोठ्या ठिपक्यामध्ये रुपांतरित होऊन ठिपक्याच्या कडा पिवळ्या होतात. प्रादुर्भाव अधिक असल्यास नुकसानग्रस्त पाने पिवळी पडून गळतात. खोडावरील ठिपके फांद्यांवर पसरून परिणामी खोड व फांद्या वाळतात.

नियंत्रण

एक ग्रॅम स्ट्रेप्टोमायसीन अधिक ३0 ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराइड प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन पिकावर फवारणी करावी.

भुरी रोग

पिकामध्ये भुरी रोग साधारणतः डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यादरम्यान आढळतो. पांढरी पावडर पानाच्या खालच्या बाजूला आढळते. अधिक प्रमाणात प्रादुर्भाव असल्यास पाने पिवळी पडून गळतात फुलांची निर्मिती पूर्णतः बंद होते.

नियंत्रण

 

  1. पाण्यात विरघळणारे गंधक ३0 ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
  2. ट्रायडिमेफोन किंवा पेनकोनझोल किंवा मायकोबुटानिल हे बुरशीनाशक १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

विषाणुजन्य रोग

विषाणुजन्य रोगाचा (काकडी मोझाक विषाणू, बटाटा विषाणू तंबाखू मोझाक विषाणू आणि पर्णगुच्छ विषाणू इ.) प्रादुर्भाव हा बियाण्यामार्फत किंवा मावा, फुलकिडे व तुडतुडे या रसशोषण करणा-या किडींद्वारे होतो. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रोगामुळे पानाच्या आकारात बदल होतो. पानाच्या पृष्ठभागावर हलक्या आणि गर्द हिरव्या रंगाचे ठिपके आढळतात. तसेच पाने काठाने गुंडाळतात आणि झाडाची वाढ खुटते आणि फुलांची निर्मिती बंद होते.

नियंत्रण

  1. मिरची पिकामध्ये स्वच्छता ठेवून पीक तणमुक्त ठेवावे. रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगग्रस्त झाडे मुळासकट उपटून टाकावीत व जाळून नष्ट करावीत. जेणेकरून या रोगाचा संपूर्ण पिकामध्ये प्रादुर्भाव होणार नाही.
  2. रसशोषण करणा-या किडीच्या नियंत्रणासाठी गरजेनुसार ऍसिफेट १0 ग्रेम किंवा फिप्रोनिल २0 मि.लि. प्रति १0 लिटर पाUयात घेऊन फवारणी करावी. मिरची पीक क्षेत्राच्या कडेला दोन-तीन ओळींमध्ये मका पिकाची लागवड करावी. मिरची पिकावरील रोग व उपाय

संदर्भ:- vikaspedia

हे पण वाचा:- 

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *