हवामान अंदाज – मॉन्सूनचा वेग मंदावला, हवामानात बदल

monsoon-slows-down-climate-change

हवामान अंदाज – मॉन्सूनचा वेग मंदावला, हवामानात बदल

 

पुणे : उत्तर भारतातील काही भागात नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) दाखल झाले आहे. दोन दिवसापासून फारसे पोषक वातावरण नसल्याने मॉन्सूनचा वेग काहिसा मंदावला आहे. मंगळवारी (ता.१५) मॉन्सूनने फारशी प्रगती केलेली नव्हती. त्यामुळे पोषक वातावरण तयार झाल्यानंतर आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सुत्रांनी वर्तविली.

 

हे पण वाचा :- कृषी यंत्रावर मिळते ’50 टक्के सबसिडी ’

 

केरळमध्ये तीन जून मॉन्सून दाखल झाल्याने उत्तरेकडे वेगाने वाटचाल केली आहे. मात्र, उत्तर भारतात मॉन्सून गेल्यानंतर वारे हळूहळू सरकत आहे. रविवारपासून मॉन्सून दीव, सुरत, नंदुरबार, भोपाळ, नाऊगाऊ, हमिरपूर, बाराबंकी, बरेली, शहारानपूर, अंबाला आणि अमृतसरपर्यत असल्याने अनेक भागात व्यापत आहे.

 

त्यातच झारखंड व परिसराच्या वायव्य भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे. तसेच उत्तर प्रदेशाच्या पूर्व व बिहराच्या परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती असल्याने वाऱ्यांचा वेग काहिसा कमी झाला आहे.

 

मॉन्सूनला पुढे सरकण्यासाठी उत्तर पाकिस्तानच्या परिसरातही चक्रिय वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. येत्या दोन ते तीन दिवसात ही स्थिती सक्रिय होण्याची शक्यता आहे. तसेच राजस्थानच्या वायव्य भाग ते बंगालचा उपसागराचा वायव्य भाग या दरम्यान असलेल्या हरियाना, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याशिवाय हरियानाच्या उत्तर भागात व आसामच्या दक्षिण भागात चक्रिय वार्याची स्थिती तयार होत आहे. त्यामुळे मॉन्सूनचा प्रवाह कमी झाला आहे.

संदर्भ :- agrowonegram.com

 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *