मान्सूनची राज्याकडे वेगाने कूच, 2-3 दिवसात राज्यात धडकण्याची शक्यता:- जेष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर

मान्सून पाऊस

मान्सूनची राज्याकडे वेगाने कूच, 2-3 दिवसात राज्यात धडकण्याची शक्यता:- जेष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर

महाराष्ट्रासाठी चांगली बातमी असून पुढील 2-3 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होईल, अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे. 

 

महाराष्ट्रासाठी चांगली बातमी असून पुढील 2-3 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होईल, अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे. मान्सून वेगानं पुढे सरकत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. पुढील पुढील 2-3 दिवसात मान्सून पुढे मध्य अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये, महाराष्ट्र व गोव्यातील भागांमध्ये व आणखी काही भागांमध्ये जाण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
——————————————-
मान्सून कुठे पोहोचला?

 

भारतीय हवामान विभागाची माहिती शेअर करत के.एस.होसाळीकर यांनी मान्सून कुठे पोहोचला आहे हे सांगितलंय. मान्सून पुढे सरकत असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. मान्सून अरबी समुद्रातून पुढे सरकत असून लक्षद्वीप, केरळ, किनारपट्टीचा काही भाग, दक्षिण कर्नाटक, उत्तर कर्नाटक, आंध्र प्रदेशातील काही भाग आण तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालच्या उपसागरात मान्सून पुढे सरकला असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

दोन तीन दिवसात कोकण पश्चिम महाराष्ट्रात पाऊस

पुढचे 2, ३ दिवस राज्यामध्ये बहुतेक ठिकाणी गडगडासहित पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठाणे, रायगड, दक्षिण कोकण, पुणे, कोल्हापूर,सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे.

 

मान्सून सरासरीच्या 101 टक्के बरसणार

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून 3 जूनला केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीने यंदाचा मान्सून सरासरीच्या 101 टक्के असेल असा अंदाजानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 101 टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जातं मान्सूनची राज्याकडे 

 

कोणत्या विभागात किती पाऊस पडणार?

भारतीय हवामान विभागनं वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनचा पाऊस उत्तर पश्चिम भारतात 92-108 टक्के होण्याती शक्यता आहे. तर, दख्खनच्या पठारावर 93-107 टक्के पाऊस होऊ शकतो. उत्तर पूर्व भारतात 95 टक्के तर मध्य भारतात 106 टक्के पेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. भारतीय हवामान विभाग जून महिन्याच्या शेवटी जुलै महिन्याचा पावसाचा अंदाज व्यक्त करणार आहे.

 

राज्यात 5,6,7 जून पर्यंत

 

कोकन पट्टी ,

प .महाराष्ट्र

दक्षिण महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र

मराठवाडा

प. विदर्भ या सहा विभागात उद्या पासून दि .5,6,7, तारखेत दररोज भाग बदलत जोरदार पाउस होइल . फक्त पूर्वविदर्भात पावसाचे प्रमाण कमी राहील

संदर्भ:- TV9 Marathi

 

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची माहिती मोफत मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *