Search
Generic filters

हवामान विभागाचा अंदाज : मान्सून ‘या’ तारखेपासून घेणार माघार वाचा सविस्तर!

हवामान विभागाचा अंदाज : मान्सून 'या' तारखेपासून घेणार माघार वाचा सविस्तर!

हवामान विभागाचा अंदाज : मान्सून ‘या’ तारखेपासून घेणार माघार वाचा सविस्तर!

भारतीय मान्सून म्हणजेच देशातील पावसाळ्याचा हंगाम यंदा जास्तच दिवस मुक्काम ठोकून आहे. परंतु ही पहिलीच वेळ नसून गेल्या 41 वर्षांत असा मुक्काम वाढविण्याचा अर्थात मान्सून वारे माघारी फिरण्यास दुसऱ्यांदा विलंब होत असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागाने यंदाच्या वर्षी सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवला होता.

मान्सून भारतातून साधारणतः 17 सप्टेंबरच्या आसपास आपला मुक्काम हलवतो. परंतु यंदा मात्र तो 6 ऑक्टोबरपासून वायव्य भारतातून माघार घेण्यास सुरुवात करेल असे सांगण्यात आले आहे. असे दुस-यांदा होते आहे, गेल्या 2019 मध्ये मान्सून मुक्काम जास्त होता आणि त्याचा परतीचा प्रवास 9 ऑक्टोबर 2019 रोजी सुरू झाला होता. गेल्या वर्षी, म्हणजेच 2020 मध्ये मान्सूनने 28 सप्टेंबर रोजी माघार घेण्यास सुरुवात केली होती.

हे पण वाचा:- खुशखबर : ई-पिक पाहणी पिक नोंदणीसाठी मुदत वाढली!

मात्र या वर्षी मान्सून हंगाम पुर्णपणे केव्हा संपेल घेईल याबाबत अंदाज वर्तवला नाही.

हवामान विभागने जारी केलेल्या एका निवेदनात जून ते सप्टेंबरच्या दरम्यान मान्सूनच्या सरासरी पावसाची आकडेवारी दिली आहे. त्यात दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या, 1961 ते 2010 च्या (LPA -99%, दिर्घ काळ सरासरी 99%) आकडेवारीचा विचार करता 88.0 सेमीच्या दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या तुलनेत एकूण 87.0 सेमी इतका पाऊस झाला आहे. हवामान विभागाच्या मते, देशाच्या वायव्य भागात मान्सून सामान्य होता (96%), पूर्व आणि ईशान्य भारतात (88%) सामान्यपेक्षा कमी होता, तर मध्य भारतात (104%) आणि दक्षिणेकडील द्वीपकल्प (111%) पेक्षा सामान्यपेक्षा जास्त होता. देशातील बहुतेक पाऊस-आधारित कृषी क्षेत्रांचा समावेश असलेल्या मान्सून ‘Core Zone’मध्ये पाऊस, LPA पेक्षा 106% म्हणजेच सामान्यपेक्षा जास्त होता. संपूर्ण देशात LPA च्या तुलनेत जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अनुक्रमे 110%, 93%, 76% आणि 135% इतका पाऊस झाला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

परतीच्या प्रवासातही मान्सून भारतीय उपखंडावर बरसत असतो. त्यासाठीही हवामान विभागाने ऑक्टोबर महिन्यासाठीच्या संभाव्य अंदाजानुसार, देशातील बहुतांश भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता  वर्तविली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात वायव्य भारताच्या बहुतांश भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, जे सहसा कोरडे महिने असतात. तर ईशान्यकडील मान्सून पाऊसाची शाखेद्वारेही वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांत भारतामध्ये साधारण पाऊस होण्याची शक्यता असते.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये वरील सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने देशाच्या विविध भागांमध्ये उभ्या असलेल्या हिवाळ्याच्या पिकावर परिणाम होईल की नाही ह्याचा अंदाज एवढ्या लवकर लावणे शक्य नाही असे, आयएमडीचे महासंचालक एम. महापात्रा यांनी म्हटले आहे.

विभागाच्या विस्तारित श्रेणीच्या अंदाजात 14 ऑक्टोबरपर्यंत भारताच्या मध्य आणि पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

source: deccanviews

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *