Maharashtra Rains LIVE : महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली

Maharashtra Rains LIVE : महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली

Maharashtra Rains LIVE : महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली

 

महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. मराठवाड्यात परभणी वगैरे भागातही तुफान पावसामुळे प्रलय आल्यासारखी स्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईलगतच्या कल्याण, बदलापूर, कर्जत भागांतही पाऊस कोसळत आहे. महाडजवळून वाहणाऱ्या सावित्री आणि काळ नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले. महाबळेश्वर येथे धो धो पाऊस पडत असल्याने त्या पाण्याचे लोट सावित्री नदीतून घाटमाथ्यावरून खाली कोकणात उतरले आहेत. कोल्हापूरची स्थितीही गंभीर आहे. अशा तऱ्हेने मुसळधार पावसाने राज्यापुढे नवे संकट उभे केले आहे.

कोयनेचा विसर्ग वाढवला, धरणाचे सहा दरवाजे पाच फुटांवर

कोयनेचा विसर्ग वाढवला

धरणाचे सहा दरवाजे पाच फुटांवर

23714 कयुसेक पाणी विसर्ग नदीपात्रात सुरू

धरणात 78.31tmc पाणीसाठा झाला

सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला

सिंधुदुर्ग : पहाटे पासून पावसाचा जोर ओसरला. मात्र अजून सखल भागात पाणी

जिल्ह्यात मागील २४ तासात १३७ मिमी पावसाची नोंद
जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस वैभववाडी तालुक्यात २१९ मिमी पडला
तर सावंतवाडी तालुक्यात २१० मिमी पावसाची नोंद

सांगलीला पुन्हा महापुराचा धोका

सांगलीला पुन्हा महापुराचा धोका,

कृष्णा नदीची पाणी पातळी 50 ते 52 फुटापर्यंत वर जाऊ शकते,

जिल्हा प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कुडाळमधील माणगाव खोऱ्यातील सर्वच नद्यांना पूर

सिंधुदुर्ग : राञी उशीरा झालेल्या ढगफूटी सदृश्य पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी.

कुडाळ मधील माणगाव खो-यातील सर्वच नद्यांना आला पूर
अनेक रस्ते गेले पाण्याखाली
पावसाने आता विश्रांती घेतली असली तरी अनेक ठिकाणी सकल भागात पाणी
अनेक ठिकाणी विद्युतपुरवठा खंडीत…

गोसेखुर्द धरणाचे 3 दरवाजे 0.5 मीटरने उघडले

भंडारा जिल्ह्यात रात्री मुसळधार पाऊस बरसल्याने वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द धरणाचे 3 दरवाजे 0.5 मीटरने आज सकाळी 6 वाजता उघडण्यात आले आहेत.  नदीपात्रा जवळील गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कोल्हापूरच्या पूरस्थितीचं गंभीर, नद्यांची पाणी पातळी वाढल्याने पुणे बेंगलोर महामार्ग बंद

कोल्हापूर जिल्ह्याची पूरस्थिती गंभीर रूप घेतीय. पुणे-बेंगलोर महामार्गालगत असणार्‍या नद्यांची पाणी पातळी वाढल्याने महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.

पंचगंगा नदीची पाणीपातळी अजूनही झपाट्याने वाढतेय

पंचगंगा नदीची पाणीपातळी अजूनही झपाट्याने वाढतेय

पाणी पातळी वाढत राहिल्यास परिस्थिती गंभीर बनेल

इंडिया रेप टीमचे प्रमुख ब्रिजेश रैकवार यांनी व्यक्त केली भीती

source:- TV9 Marathi

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व