अशी पहा ‘नानाजी देशमुख’ योजनेमध्ये झालेली नवीन गावे सामाविष्ठ याद्दी

अशी पहा ‘नानाजी देशमुख’ योजनेमध्ये झालेली नवीन गावे सामाविष्ठ याद्दी

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जी नानाजी देशमुख मध्ये नवीन गावे येणार होती ती आलेली आहेत. तर त्यामध्ये कुठली कुठली गावे आलेली आहेत आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हि योजना राबवली जात आहे ते आपण पाहणार आहोत. सुरवातीला ३५० गावे आलेली होती पूर्ण महाराष्ट्र मधून तर आता जी आहेत ५१४२ याच्या यामध्ये समाविष्ट झालेली आहेत.

चला तर पाहू नानाजी देशमुख योजने मध्ये सामाविस्ट झालेली गावे 

१) पहिल्यांदा महापोकारा या पुढील दिलेल्या लिंकवर जावे  https://mahapocra.gov.in/

२) नानाजी देशमुख या योजने मध्ये तुम्हाला कुठले कुठले जिल्हे आहेत हे पाहायचे असतील तर पुढील लिंकवर जा   https://mahapocra.gov.in/home/project_plan  ह्या लिंकवर गेल्यावर  कोणते कोणते जिल्हे सामाविस्ट केले आहेत ते तुम्हाला दिसतील.

३) आता आपण नवीन यादी जी आलेली आहे ती पहाणार आहोत ह्या लिंकवर जाऊन तुम्ही pdf स्वरूपात पाहू शकता आपल्या गावाची नावे https://mahapocra.gov.in/site/NDKSP-List-of-5142-villages.pdf  ह्या लिंकवर तुम्हाला गावे दिसतील

काय आहे नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प

या प्रकल्पा मध्ये शेतकरी यांचेसाठी वैयक्तीक लाभाचे घटक उदा. वृक्ष लागवड, फळबाग लागवड, पॉली हाऊस, शेडनेट हाऊस, पॉली हाऊस/शेड नेट यामध्ये फुलपीके/भाजीपाला लागवड, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, इतर कृषी आधारित उद्योग, गांडुळ खत यूनिट,नाडेप कंम्पोस्ट,सेद्रीय निविष्ठा उत्पादन यूनिट, शेततळे ,शेततळे अस्तरिकरण, विहिर, ठिबक संच, तुषार संच,पंप संच, पाईपलाईन यासाठी शेतकरी यांना अनुदान मिळते.

तसेच भूमीहीन कुटुंबातील व्यक्ती,विधवा,परित्यक्ता महिला, घटस्फोटीत महिला, अनुसूचित जाती / जमाती मधिल महिला शेतकरी याना बंदिस्त शेळीपालन व कुक्कुट पालन या घटकां चा लाभ मिळतो.

तसेच हवामान अनुकूल वाणांचे बिजोत्पादन, बियाणे प्रक्रिया उपकरणे, बियाणे सुकवणी यार्ड, बियाणे साठवण गोदाम यासाठी ही या प्रकल्पांतर्गत अर्थ सहाय्य देण्यात येते.

या प्रकल्पातील गावांमधील अल्प/अत्यल्पभुधारक शेतकरी (2 हेक्टर पर्यंत जमीन असलेले) आणि भूमीहीन कुटुंबे यांना वैयक्तीक लाभाच्या बाबीं साठी 75 टक्के अर्थ सहाय्य देण्यात येते. तसेच 2 हेक्टर पेक्षा जास्त परंतू 5 हेक्टर पर्यंत जमीन असलेले शेतकरी यांना वैयक्तीक लाभाच्या बाबीं साठी 65 टक्के अर्थसहाय्य देण्यात येते.

त्याचप्रमाणे शेतमाल वृद्धिसाठी हवामान अनुउदयोन्मुख मुल्य साखळ्यांचे बळकटी करण अंतर्गत बँका यांनीं मुल्यांकन केलेल्या व्यावसायिक प्रस्ताव, कृषी अवजारे बँक यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी/शेतकरी गटांना 60 टक्के अर्थ सहाय्य देण्यात येते. अशी पहा ‘नानाजी देशमुख’ अशी पहा ‘नानाजी देशमुख’

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व