Search
Generic filters

कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी ही नवी योजना जाहीर

कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी ही नवी योजना जाहीर

मुंबई:- ज्या शेतकऱ्यांचे नाव महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत नाव आले नाही. तसेच मागील थकबाकीमुळे ज्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नाही. अशा शेतकऱ्यांना देखील कर्जपुरवठा केला जाणार असल्याची माहिती राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिली आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वर्धापन दिनानिमित्त बॅंकेच्या मुख्यालयात मोबाईल व्हॅन सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्य सरकारने कमी वेळेत आणि कमी त्रासात शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीबरोबरच, येत्या खरीप व रब्बी हंगामासाठी त्याला सहजरित्या कर्जपुरवठाही उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. त्या दृष्टीनेही सरकार पावले उचलत आहे. ज्या शेतकऱ्याना थकबाकीमुळे पीककर्ज मिळण्यात अडचणी येत होत्या अशा शेतकऱ्यांनाही आता कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सहकार आयुक्तांनी सांगितले आहे.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पुढील टप्प्याला लवकरच सुरवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी बॅंकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे, शहर उपनिबंधक नागनाथ कंजिरे उपस्थित होते. प्रशासक कालावधीत सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सुधारलेल्या आर्थिक स्थितीचेही सहकार आयुक्त कवडे यांनी कौतुक केले.कर्जमाफी न मिळालेल्या कर्जमाफी न मिळालेल्या

Ref:-  agrowonegram.com

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

1 thought on “कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी ही नवी योजना जाहीर”

  1. Santosh vitthal hande

    Chalu baki shithkaryna kai aati sharthi gatla 3 varsh regular parth fad kyli tarch 50000 proshan aanudan milal boltatyth BANK wale

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *