येत्या ५ दिवसात राज्यात पूर्व मोसमी पाऊस पडण्याची शक्यता!

हवामान अंदाज

येत्या ५ दिवसात राज्यात पूर्व मोसमी पाऊस पडण्याची शक्यता!

 

पुणे- राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. पुढील पाच दिवसात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाचा अंदाज आहे.

 

राज्यात उद्यापासून हवामान मध्य स्वरुपाचे राहणार असून विदर्भात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती हवामान तज्ज्ञ होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यामातून दिली आहे.

 

राज्यामध्ये बदलत्या हवामानाचा(Of the weather)बराच परिणाम दिसून येत आहे अनेक ठिकाणी उन्हाळा जाणवत आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्मिती झाली आहे. अशा बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक फटका चंद्रपूर जिल्ह्याला बसला आहे.

हे पण वाचा:- या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पीएम किसानचे २ हजार रु, योजनेतून त्वरीत काढा नाव, अन्यथा होईल कारवाई

 

राज्यात सध्या पडत असलेला पाऊस, पूर्व मोसमी असून पुढील पाच दिवस हा पाऊस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विदर्भ- मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हा पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मात्र, हा पाऊस सर्वदूर पडणार नाही. असेही हवामान विभागाने म्हटले आहे. 7 ते 15 जून दरम्यान मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होते. मात्र, 20 मे नंतरच मान्सूनच्या आगमनाची अचूक माहिती वर्तविली जाऊ शकेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. येत्या ५ दिवसात येत्या ५ दिवसात
——————————————————————————————————————————-
कृषी क्रांती च्या जिल्हा निहाय Whats App ग्रुप ला जोडले जा, तुम्ही आधी पासून कृषी क्रांती च्या Whats App ला जोडले गेले असाल तर इतर मित्र मंडळी ला सांगा.तुम्ही पुन्हा पुन्हा जोडले जात असाल तर सारखी तीच माहिती येत राहील, इतर  जिल्ह्यातील ग्रुप ला जोडले गेलात तर काढून टाकण्यात येईल, त्यामुळे एकदाच ग्रुप ला जोडले जा व आपल्याच जिल्ह्यालाच जोडले जा. जोडण्यासाठी खालील लिंकचा वापर करा
——————————————————————————————————————————-

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व