पुढच्या 4 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणाला दोन दिवसांचा रेड ॲलर्ट

हवामान अंदाज

पुढच्या 4 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणाला दोन दिवसांचा रेड ॲलर्ट

 

मान्सून महाराष्ट्रात चांगलाच सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने पुढील चार दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

 

पुणे: मान्सून महाराष्ट्रात चांगलाच सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने पुढील चार दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 20 आणि 21 तारखेला कोकणाला रेड ॲलर्ट  अतिवृष्टीचा दिला इशारा आहे. मध्य महाराष्ट्रात आणि घाटमाथ्यावर 19 आणि 20 तारखेला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रात आणि घाटमाथ्यावर 19 आणि 20 तारखेला मुसळधार पावसाचा इशारा पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिला आहे. उद्या कोकणात रायगड, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हे पण वाचा:- कृषी यंत्रावर मिळते ’50 टक्के सबसिडी’, कसा मिळवायचा लाभ- वाचा सविस्तर

20 आणि 21 जूनला रेड अ‌ॅलर्ट

हवामान विभागानं पुढील चार दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर, 20 आणि 21 जूनला कोकणाला रेड अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे हवामान वेधशाळेचे अनुपम कश्यपी यांनी ही माहिती दिली आहे.

 

मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कमी होणार

अनुपम कश्यपी यांनी 20 तारखेनंतर मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कमी होणार असल्याचं सांगितलं.

मुरबाडमध्ये मुसळधार पाऊस

आज दुपारी मुरबाड मध्ये मुसळधार पाऊस पडल्याने बाजरपेठेत पाणी साचले होते. आज दुपारी मुरबाड मध्ये झालेल्या मुसळधार पावसाने मुरबाड बाजरपेठे मध्ये पावसाचे पाणी तुंबल्याने गुढघाभर पाणी रस्त्यावर साचल्याने मुंबई सारखी मुरबडची परिस्थिती झाली. या पावसाच्या पाण्याने मुरबाड बाजारपेठेतील दुकानदार व नागग्रीकांची तारांबळ उडाली.

कोल्हापूरमध्ये पंचगंगेची पाणी पातळी वाढली

गेल्या तीन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.पंचगंगा नदीची पाणीपातळी 34 फुटांवर गेली असून तिची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. पावसाचा जोर कायम असल्याने नदीचे पाणी आता आजूबाजूच्या शेतात पसरायला सुरुवात झालीय. वाढलेल्या पाणीपातळी पंचगंगेचं मनात धडकी भरवणार रूप पुन्हा एकदा पाहायला मिळतय. पुढच्या 4 दिवसात 

संदर्भ:- TV9 Marathi

 

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची माहिती मोफत मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

 

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *