खुशखबर शेतकऱ्यांच्या मागणीला यश, आशियातील कांद्याची सर्वात मोठी बाजार समिती लासलगावमध्ये कांद्याचे लिलाव सुरु

कांदा

खुशखबर शेतकऱ्यांच्या मागणीला यश, आशियातील कांद्याची सर्वात मोठी बाजार समिती लासलगावमध्ये कांद्याचे लिलाव सुरु

 

नाशिक: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे गेल्या 13 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात बंद असलेल्या 15 बाजार समित्या सुरु झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर आशियातील कांद्याची सर्वात मोठी बाजार समिती लासलगावमध्ये कांद्याचे लिलाव सुरु झालेत. बाजार समित्यांमध्ये आजपासून कांद्याचे लिलाव पुर्ववत सुरू झाल्याने आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

कोरोना रोखण्यासाठी बाजारसमित्या 12 मे पासून बंद

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्यामुळे लासलगावसह जिल्ह्यातील कांद्याच्या प्रमुख 15 बाजार समित्या 12 मेपासून बंद ठेवण्यात आल्या होत्या. आज पासून लासलगावसह सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा व धान्यचे लिलाव पूर्ववत सुरू झाले आहेत. लिलावला येताना शेतकऱ्यांनी कोरोनाची चाचणी करून येणे तसेच वाहन नोंदणी करणे बंधनकारक केली आहे. त्यानंतर बाजार समिती आवारात शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालासह प्रवेश दिला जाणार आहे,अशी माहिती लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली.

हे पण वाचा:- वारस नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? वाचा सविस्तरपणे

लासलगाव बाजारसमितीत 500 गाड्या दाखल

लासलगाव बाजार समितीमध्ये 500 वाहनातून आलेल्या कांद्याला कमाल 1571 रुपये, किमान 700 रुपये तर सर्वसाधारण 1400 रुपये इतका बाजार भाव मिळाल्याचे बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगतिलं आहे.  

शासनाच्या नियमांचं पालन करु, बाजारसमित्या सुरु ठेवा

गेल्या 13 दिवसांपासून बाजार समितीमध्ये कांदा लिलाव हे बंद होते व ते आज सुरु झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण बघायला मिळाले. बाजार समितीमध्ये येताना आम्ही शासनाचे नियमांचे पालन करू शासनानं बाजार समिती सुरू ठेवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

गेल्या 13 दिवसांपासून लासलगावसह जिल्ह्यातील प्रमुख 15 बाजार समित्या बंद होत्या. आज कांदा लिलाव पूर्ववत सुरू करण्याअगोदर शेतकऱ्यांची कोरोना तपासणी लासलगाव प्रवेशद्वारावर करण्यात आली. बाजार समिती आवारात आलेले कांदा वाहन तपासणीनंतर सोडण्यात आले.

संदर्भ:- TV9 Marathi

 

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे माहिती मोफत मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *