खरीप पुर्व हंगामातील कांदा येणार बाजारात, कमी होणार का भाव? जाणुन घ्या

खरीप पुर्व हंगामातील कांदा येणार बाजारात, कमी होणार का भाव? जाणुन घ्या

खरीप पुर्व हंगामातील कांदा येणार बाजारात, कमी होणार का भाव? जाणुन घ्या

 

कांद्याची आवक त्यात आता  खरीप पुर्व हंगामातील  कांदा आता बाजारात दाखल होत आहे. त्याआगोदरच पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याला विक्रमी दर मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये कमाल दर हा 4400 प्रति क्विंटलवर पोहचला आहे तर किमान भाव 1600 व सर्वसाधारण दर हा 2400 रुपये राहिलेला आहे. असे असले तरी सर्वात मोठी बाजारसमिती असलेल्या लासलगावमध्ये 13 नोव्हेंबर रोजी 2575 असा दर होता. यातच आता खरीप पुर्व हंगामातील कांदा पुढील आठवड्यात बाजारात येणार असल्याने दरावर काय परिणाम होणार का याबाबत चर्चा रंगू लागली आहे.

पिंपळगाव आणि लासलगावच्या दरात एवढ्या मोठ्या प्रमाणात तफावत कशी असा सवाल तुम्हाला पडला असेल मात्र, या बाजार समितीमध्ये दाखल होणारा कांदा हा बियाणे तयार करण्यासाठी वापरला जात असल्याने त्याचे दर कायम चढेच असल्याचे मत महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी व्यक्त केले आहे.

आवकमध्ये का होत आहे वाढ

कांद्याची आवक ही वाढलेली आहे. त्यामुळे दरात घट झाली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला 1 ते 2 हजाराचा दर मिळत आहे. मात्र, शेतकऱ्यांचा उत्पादनावर 2 हजारापर्यंत खर्च झालेला आहे. उत्पादनावरील खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना 30 ते 35 रुपये किलेप्रमाणे दर मिळाला तरच फायद्याचे राहणार आहे. मात्र, आता कांद्याची आयात शिवाय पुर्व खरिपात लागवड केलेला कांदा हा बाजारात येत असल्याने अणखीन दर घसरणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यातच दिवाळीमुळे बाजार समित्या ह्या बंद असल्याने आता आवक वाढत आहे. या सर्व बाबींचा दरावर परिणाम होणार आहे.

हे पण वाचा:- सोयाबीनच्या दरात होत आहे सुधारणा, शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला..?

पुर्व खरीप कांद्याचा दरावर परिणाम होणार नाही : दिघोळे

कांद्याच्या एकूण उत्पादनापैकी 65 टक्के कांदा हा रब्बी हंगामात लागवड केलेला असतो. खऱीप हंगामातील केवळ 15 टक्केच कांदा आता बाजारात येणार आहे. शिवाय पावसामुळे या कांद्याचे नुकसानही झालेले आहे. त्यामुळे खरीप पुर्व हंगामातील कांद्याची आवक सुरु होईल पण त्याचे प्रमाण हे कमी असणार आहे. शिवाय हा कांदा केवळ बियाणासाठी वापरला जातो. त्यामुळे याचा ग्राहक हा मर्यादित आहे. या सर्व बाबींमुळे कांद्याच्या दरावर याचा थेट परिणाम होणार नसल्याचे मत महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी व्यक्त केले आहे. व्यापाऱ्यांची लॉबी इतकी मजबूत आहे की त्यांना त्यांचे स्वार्थ दिसते आणि किंमत कमी होते. म्हणून आमच्या संस्थेचे स्वतंत्र विपणन नेटवर्क तयार करायचे असल्याचेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन केव्हा घेतले जाते

  • रब्बी हंगाम : या हंगामातील कांदा पेरणी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होते आणि ती जानेवारीपर्यंत चालते. या हंगामातील कांदा फेब्रुवारी ते एप्रिलच्या दरम्यान बाजारात येतो.
  • पुर्व खरीप : जून-जुलैमध्ये लागवड केली जाते. हे पीक नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात येते.
  • खरीप हंगाम : ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये त्याचा कांदा पेरला जातो. तर पीक डिसेंबर ते जानेवारी दरम्यान येते.

source:– tv9 marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email