Search
Generic filters

पपई लागवड माहिती तंत्रज्ञान-2021

पपई लागवड माहिती तंत्रज्ञान-2021

पपई लागवड माहिती तंत्रज्ञान-2021

 

पपई पिकाची माहिती (Papaya crop information)

पपई चा उपयोग फळ म्हणून खाण्यासाठी केकमध्ये, मसाला पानामध्ये वापरण्यात येणारी टुटी – फ्रुटी, जाम, जेली इ. पदार्थ तयार करण्यासाठी, तर पपईच्या पेपेनपासून मौल्यवान औषधे, बिअर, च्युईंगम तयार करतात. त्याचबरोबर कातडी कमविण्यासाठी, लोकर, रेशीम उद्योगात वापर करतात. पेपेनचा उद्योग सर्वसामान्यांना परवडणारा नसला तरी पेपेनच्या राहिलेल्या भागापासून टुटी – फ्रुटी तयार करता येते व हा टुटी – फ्रुटीचा उद्योग या पिका मुळे करता येऊ शकतो.

जमिनीचा प्रकार

पाण्याचा निचरा चांगला होणारी तसेच जैव पदार्थांचा भरपूर पुरवठा असलेली जमीन चांगली असते. गाळाच्या जमिनीत त्याचप्रमाणे भारताच्या दक्षिणेकडील भागातील मध्यम काळी जमिन ह्या फळास मानवते .

 

हवामान

पपई पिकास सरासरी तापमान २५ ते ३८ अंश से आणि वार्षिक पर्जन्यमान १५०० मि. मी . मानवते

 

पिकाची जात

तैवान, पपई सिलेक्शन क्र. १,२,३ व ५, को-५, को- ६, पुसा ड्वार्फ, पुसा नर्हा, पुसा जायंट, पेपेनसाठी को -६, व पुसा मेजेस्टी.

 

लागवड

रोपे तयार करणे : चांगल्या जातिवंत पुष्कळ फळे देणाऱ्या झाडाच्या पूर्ण पिकलेल्या फळांचे बी घेऊन ते धुवून स्वच्छ करून व सावलीत वाळवून साठवून ठेवतात. लागवडीच्या वेळेच्या आधी सु. दोन महिने रोपांसाठी बी पेरतात. एक हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यासाठी रोपे तयार करावयाला २५० ग्रॅ. बी पुरेसे होते. बी सामान्यतः गादी वाफ्यांत लावतात. रोपे ९ – १२ सेंमी. उंचीची झाल्यावर ती वाफ्यांतून काढून तयार केलेल्या जमिनीत कायम जागी लावतात. दोन खड्‌ड्यांमध्ये २-३ मी अंतर ठेवून रोपे लावतात.

 

खत व्यवस्थापन

लागवडी नंतर २००:२००:२०० ग्रॅम नत्र ,स्फुरद व पालाश प्रत्येक झाडास लागवडीनंतर सामान ४ हप्त्यात पहिल्या ,तिसऱ्या ,पाचव्या आणि सातव्या महिन्यात बांगडी पद्धतीने विभागून द्यावीत .

हे पण वाचा:- ड्रॅगन फ्रुट लागवड माहिती-2021

पाणी व्यवस्थापन

पपई पिकास पाणी देणे गरजेचे आहे. पाणी बांगडी पद्धतीने द्यावे. उन्हाळ्यामध्ये ५ ते ६ दिवसांचे अंतराने शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. खोडाशी पाण्याचा संपर्क न येण्याची काळजी घ्यावी. कारण ह्यामुळे खोड कुजण्याचा संभव असतो.पपईत ठिबक सिंचनाची सोय सुरुवातीपासून करणे आवश्यक आहे ठिबक असल्यास उत्पादनात वाढ होते.

 

रोग नियंत्रण

पपईच्या झाडांना पायकूज किंवा बुंधा सडणे, मर, करपा, भुरी व विषाणू रोगांची बाधा होते. या वरती रोगाची तीव्रता आणि लक्षणे बघून योग्यता फवारणी घ्यावी . सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी रासायनिक उपाय म्हणजे प्रति हेक्टरी ३ क्विंटल इथिलीन डायब्रोमाईड जमिनीत मिसळून देणे. किंवा प्रत्येक झाडाभोवतीच्या जमिनीत २० ग्रॅम फ्युराडान मिसळून द्यावे. निंबोळी, करंज, एरंडी पेंड जमिनीत मिसळावी.तसेच,बागेत झेंडूची झाडे लावावीत.

 

उत्पादन

पपईचे पहिले पीक काढणीसाठी तयार होण्यास १० ते १२ महीन्यांचा कालावधी लागतो. एका झाडापासून जातीनुसार सरासरी ६० ते २०० पर्यंत फळे मिळतात. संकरीत पपईचे वजन १।। ते २ किलोपर्यंत तर देशी पपईचे वजन ३ ते ४ किलोपर्यंत मिळते.

 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

1 thought on “पपई लागवड माहिती तंत्रज्ञान-2021”

  1. तैवान 786 लागवड करत आहोत दि.16.12.2019 ला माहिती द्यावी

Leave a Comment

Your email address will not be published.