Search
Generic filters

पेरू लागवड माहिती-तंत्रज्ञान

पेरू लागवड माहिती-तंत्रज्ञान

पेरू लागवड माहिती-तंत्रज्ञान

 

पेरू पिकाची माहिती मराठी (peru crop information in marathi)

महाराष्ट्रात पेरूची मोठया प्रमाणत लागवड केली जाते.या फळात जीवनसत्व क मोठया प्रमाणात आहे बाजार पेठे मध्ये या भरपूर प्रमाणात मागणी आहे. या फळ पासून जॅम,जेली, सुद्धा बनवली जाते .

जमिनीम पाण्याचा निचरा होणारी जमीन यासाठी योग्य आहे.जमिनीचा सामू ६ ते ६.५ दरम्यान असावा.

 

हवामान:-

या पिकाची लागवड उष्ण व समशीतोष्ण हवामानात केली जाते.

 

पेरू पिकाची जाती (Peru crop varieties)

चिट्टीदार, सरदार, आराका किरण, हिसार सफेद, श्वेता इत्यादी

 

सुधारित जाती:

पेरूच्या अनेक सुधारती जाती उपलब्ध आहेत. यापैकी व्यापारीदृष्ट्या सरदार (लखनऊ-49) व ललित या जातींची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यामध्ये सरदार (लखनऊ-49) ही जात अधिक उत्पादन आणि चांगल्या प्रतीची फळे देणारी आहे. पेरू लागवड माहिती-तंत्रज्ञान

 

लागवड:-

दाब कलम करून याची रोपे तयार केली जातात .आणि त्या नंतर ६० X ६० X ६० सें.मी आकाराचे खड्डे घेऊन २ कि. सिंगलसुपर फॉस्फेट खत टाकावे. ५ % मॅलॅथिआन (५०-६० ग्रॅम) पावडर मिसळावी. दोन झाडातील व ओळीतील अंतर ६ X ६ मीटर प्रति हेक्टरी झाडांची संख्या २७७ घन लागवडासाठी ३ X २ मी. अंतर ठेवावे.

 

पारंपारिक पेरू लागवडीचे तोटे (Disadvantages of traditional Peruvian cultivation) :

  • पारंपारिक पेरू लागवड पध्दतीमध्ये 200 X 20 फूट अंतरावर लागवड केली जाते. लागवड केल्यानंतर चौथ्या वर्षानंतर उत्पादनास सुरूवात होते. फळांच्या काढणीनंतर छाटणी केली जात नाही.
  • छाटणी करण्यामूळे बागांमध्ये फांद्यांची दाटी होते. यामूळे सूर्यप्रकाश जमीनीपर्यंत पोहचत नाही. व जमीन लवकर वाफसा स्थितीमध्ये येत नाही.
  • पारंपारिक पाणी व्यवस्थापनामध्ये झाडाभोवती गोल किंवा चौकोणी आळे तयार करून जास्त प्रमाणात पाणी दिले जाते. पाणी देण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर कमी असते. त्यामूळे बागेमध्ये ओलावा व आर्द्रता वाढल्यामूळे फळमाशीचे प्रमाण वाढते.
  • झाडांना शेणखत किंवा सेंद्रीय खताचा वापर कमी केल्यामूळे रासायनिक खतांचा वापर जास्त असल्यामूळे जमिनीतील सामू-क्षारांचे प्रमाण वाढते. व पांढरी मूळी जास्त वाढत नाही. परिणामी फळांचा आकार वाढत नाही. आणि पुढे लवकर परिपक्व होऊन गळतात

 

खत व्यवस्थापन:-

पूर्ण वाढ झालेल्या झाडाला ४ ते ५ घमेली शेणखत ३०० ग्राम स्फुरद व ३०० ग्राम पालाश बहर धरते वेळी दयावी व उरलेले खताची मात्रा फळे लागतील त्यावेळी दयावी.

 

पाणी व्यवस्थापन:-

रोपाच्या सुरवातीच्या वाढीच्या काळात नियमित पा णी दयावे. त्यानंतर जमिनीच्या मगदूर नुसार पाणी दयावे.तसेच फुल व फळ धरणेच्या काळात पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी . पेरू लागवड माहिती-तंत्रज्ञान: agriculture information in marathi

                              

Pm Kisan Yojana: तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर इथे करा तक्रार

 

रोग नियंत्रण:-

किडी:-

१) फळमाशी – फळांचा आतील भाग मध्ये आढळते ती आतील भागावर उपजीविका करते.

 

उपाय:-

१) किडलेली फळे काढून टाकून शेताच्या बाहेर पुरावी

2) किडी होऊ नये म्हणून प्रथम निमार्क ची ६० ते ७५ मिली १५ लिटरच्या पंपाला फवारणी करावी.

३) शेता मध्ये ४ ते ५ रक्षक सापळे बसवावेत

२) फुल किडे ,मावा ,तुडतुडे ,पांढरी माशी – निमार्क ची २५/३० मिली फवारणी करावी

३) पिठ्या ढेकूण – या च्या नियंत्रण साठी जैविक व्हर्टिसीलियम ५० ग्राम + १०० मिली दूध १० लिटर पाण्यात मिसळून फवारवे

 

छाटणीचे वेळापत्रक:-

अ.क्र महिना व करावयाची कामे छाटणी संदर्भात माहिती
1 पेरूची लागवड दाब कलमांच्या रोपांची लागवड करावी
2 लागवडीनंतर 3 महिन्यांनी जमिनीपासून 60 सेमी अंतरावर शेंडा तोडणी/कट करावा
3 पहिल्या छाटणीनंतर 3 महिन्यांनी परत दुसरी छाट्णी करावी. (लागवडीनंतर 6 महिन्यांनी) 3-4 फांद्या चारी बाजूने सारख्या अंतरावर ठेवून इतर फांद्या काढून टाकाव्यात
4 दुसऱ्या छाटणीनंतर 2-2.5 महिन्यांनी परत तिसरी छाटणी करावी (लागवडीनंतर 9 महिन्यांनी) चार फांद्या ज्या ठेवल्या आहेत (प्राथमांक) या फांद्यांची 50 टक्के (अर्धा) छाटणी करावी व खालचा 50 टक्के (अर्धा) भाग जो परिपक्व व तांबड्या रंगाचा आहे तोच भाग ठेवावा.
5 तिसर्‍या छाटणीनंतर परत पुन्हा 3 महिन्यांनी फांद्यांची चौथी छाटणी करावी (लागवडीनंतर 12 महिन्यांनी) ज्या परिपक्व फांद्या ठेवलेल्या आहेत त्या फांद्यांची 50 टक्के शेंडा छाटणी करावी म्हणजेच या ठिकाणी फुले लागतात व फळधारणा होते.
6 लागवडीनंतर 1 (महिन्यांची 1.5 वर्षानंतर) पहिल्यांदा फळधारणा होते.
7 फळे काढणी केल्यानंतर (लागवडीनंतर 23 महिन्यांनी किंवा फळधारणेनंतर 5 महिन्यांनी) एकुण फांदीच्या 50 टक्के फांदीची छाटणी करावी. (सर्व फांद्या- बॅक प्रुनिंग)
8 छाटणीनंतर दोन महिन्यांनी (लागवडीनंतर 25 महिन्यांनी) दुसरी फळधारणा
9 लागवडीनंतर 30 महिन्यांनी तिसरी फळधारणा
  • पहिली फळधारणा लागवडीनंतर 18 महिन्यांनी
  • फळे काढणी केल्यानंतर पुन्हा एकदा एकूण फांदीच्या 50 टक्के फांदीची छाटणी करावी. (सर्व फांद्याची-बॅक प्रुनिंग करावी)
  • छाटणीनंतर पुन्हा दोन ते तीन महिन्यात परत फळधारणा चालु होते.

 

तुलना: पारंपारिक लागवड आणि सघन लागवड पध्दती:-

 

अ.क्र तुलनात्मक मुद्दा पारंपारिक लागवड पद्धत सघन लागवड पद्धत
1 फळधारणा तिसऱ्या वर्षापासून चालू होते पहिल्या वर्षापासून चालू होते
2 उत्पादन 12-15 टन/हेक्टर 30-45 टन/हेक्टर
3 व्यवस्थापन झाडाचा आकार मोठा असल्याने थोडे अवघड होते झाडाचा आकार लहान असल्यामूळे सोपे होते
4 मजूर जास्त कमी
5 उत्पादन खर्च जास्त कमी
6 तोडणी / काढणी अवघड सोपी
7 फळांचा दर्जा मोठा आकार, विस्तार, जास्त फांद्या, यामुळे फांद्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे फळांचा दर्जा चांगला मिली नाही झाडांचा कमी विस्तार यामुळे सर्व फांद्यांना सूर्यप्रकाश मिळतो, हवा खेळती राहते, रोग व कीड कमी प्रमाणात येते व सर्व फांद्यांना व फळांना सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे फळांचा दर्जा व उत्पादन सुधारते

उत्पादन

या फळाची काढणी फळांचा आकार वाढला की तसेच हिरवा वाढला की तसेच हिरवा वाढला की तसेच हिरवावाढला की तसेच हिरवा पेरू लागवड माहिती-तंत्रज्ञान

 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

शेती विषयक माहिती pdf

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व