शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! Pm Kisan च्या 10 व्या हप्त्याचे पैसे ‘या’ तारखेला बँक खात्यात येणार

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! Pm Kisan च्या 10 व्या हप्त्याचे पैसे ‘या’ तारखेला बँक खात्यात येणार

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! Pm Kisan च्या 10 व्या हप्त्याचे पैसे ‘या’ तारखेला बँक खात्यात येणार

 

शेतकर्‍यांसाठी आता मोठी बातमी आहे. जर तुम्ही देखील पीएम किसान (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan 10th installment) 10 वा हप्ता जारी करणार आहे. तारीख निश्चित केली असून, हप्ता हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आलीय.

गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित केले

आतापर्यंत केंद्राने भारतातील 11.37 कोटी शेतकऱ्यांना 1.58 लाख कोटी रुपये हस्तांतरित केलेत. केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM KISAN योजना) 10 वा हप्ता जारी करण्याचा विचार करत आहे. सरकारने गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित केले होते

हे पण वाचा:- राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत : प्लास्टिक मल्चिंगवर 50% टक्के अनुदानाचा ‘असा’ घ्या लाभ…!

सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये देते

पंतप्रधान किसान योजनेंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. शासन ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन वर्ग करते. तुम्हीही शेतकरी असाल पण या योजनेचा लाभ घेऊ शकत नसाल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही PM किसान सन्मान निधी मध्ये तुमचे नाव देखील नोंदवू शकता, जेणेकरून तुम्हाला सरकारच्या योजनेचा लाभ घेता येईल.

हे पण वाचा:- रब्बी हंगामातील पिक विमा भरण्यासाठीच्या महत्त्वाच्या तारखा!

नोंदणी कशी करावी?

  1. तुम्हाला सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  2. आता फार्मर्स कॉर्नरवर जा.
  3. येथे तुम्हाला ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  4. यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.
  5. यासोबतच कॅप्चा कोड टाकून राज्याची निवड करावी लागेल आणि त्यानंतर ही प्रक्रिया पुढे करावी लागेल.
  6. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
  7. यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे.
  8. त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

याचा फायदा कोण घेऊ शकतो?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 40 वयोगटातील कोणताही शेतकरी लाभ घेऊ शकतो. या अंतर्गत शेतकऱ्याकडे जास्तीत जास्त 2 हेक्टर लागवडीयोग्य जमीन असावी. योजनेंतर्गत किमान 20 वर्षे आणि कमाल 40 वर्षांसाठी 55 ते 200 रुपयांपर्यंत मासिक पैसे द्यावे लागतील. शेतकऱ्याच्या वयानुसार ते ठरवले जाते..

source:- tv9 marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

1 thought on “शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! Pm Kisan च्या 10 व्या हप्त्याचे पैसे ‘या’ तारखेला बँक खात्यात येणार”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *