Search
Generic filters

Pm kisan yojana 2021 : ‘या’ तारखेला जमा होणार पी.एम. किसान सन्मान योजनेचा निधी तुमच्या खात्यावर!

pm kisan yojana 2021

Pm kisan yojana 2021 : ‘या’ तारखेला जमा होणार पी.एम. किसान सन्मान योजनेचा निधी तुमच्या खात्यावर!

 

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातच पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 10 वा हप्ता हा खात्यावर जमा झाला होताय यंदा मात्र, हा हप्ता केव्हा जमा होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. आतापर्यंत केवळ तर्क-वितर्क मांडले जात होते पण हा हप्ता जमा करण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 15 डिसेंबर रोजी हा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे. हा जमा होणारा हप्ता दहावा असून यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे. सरकार लवकरच संपूर्ण प्रक्रियेसह हप्ता हस्तांतरित करण्यास तयार आहे.

या दिवशी होणार पैसे जमा

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत वर्षाकाठी 6 हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात.  10 वा हप्ता 15 डिसेंबर 2021 पर्यंत जमा करण्याचा सरकारचा विचार आहे. गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी सरकारने शेतकऱ्यांना पैसे खात्यावर वर्ग केले होते. त्यामुळे या कालावधी दरम्यानच पैसे जमा करण्याचा सरकराचा विचार आहे.

तर नोदणी करुन घ्या

जर तुम्ही शेतकरी असताल आणि तुम्हाला पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे. तुम्ही त्वरीत नोंदणी केली तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अन्यथा ही संधी देखील तुम्हाला गमवावी लागणार आहे. या योजनेत नोंदणी करणे खूप सोपे आहे.

या माध्यमातून करता येणार नोंदणी

नोंदणीची प्रक्रिया ही आपण घरी बसूनही करु शकता. ऑनलाईनद्वारे तुम्हाला ही माहिती भरावी लागणार आहे. याशिवाय पंचायत समिती किंवा ग्राहक सेवा केंद्रामध्येही नोंदणी करता येणार आहे. नोंदणी करिता कार्यालय किंवा ग्राहक सेवा केंद्रामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरी बसूनही ही नोंदणी करु शकणार आहात. केवळ पात्र शेतकऱ्यांनाच ही नोंदणी करता येणार आहे.

पात्र शेतकरी अशी नोंदणी करू शकतात (pm kisan registration)

  • तुम्हाला प्रथम पंतप्रधान किसान सन्मान योजना या अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे.
  • आता ‘फार्मर्स’ कॉर्नरला जा.
  • येथे आपल्याला ‘नवीन शेतकरी नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
  • आधार क्रमांक समाविष्ट करावा लागणार आहे.
  • त्याच वेळी कॅप्चा कोड घालून राज्याची निवड करावी लागते आणि मग पुढची प्रक्रिया ही करावी लागणार आहे.
  • आपल्याला आपली संपूर्ण वैयक्तिक माहिती या स्वरूपात भरणे आवश्यक आहे.
  • बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती देखील भरावी लागेल.
  • मग तुम्ही फॉर्म सादर करू शकता.

संबंधित माहिती :

  1. आता शेतकऱ्यांनाही वर्तवणार येणार पावसाचा अंदाज!
  2. राज्य सरकारची अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज!

source:- tv9 marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *