Search
Generic filters

शेतकऱ्यांसाठी खुषखबर! 9 व्या हप्त्याचे 2000 रुपये ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार

शेतकऱ्यांसाठी खुषखबर! 9 व्या हप्त्याचे 2000 रुपये ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार

शेतकऱ्यांसाठी खुषखबर! 9 व्या हप्त्याचे 2000 रुपये ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार

 

krushi kranti : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या (pm kisan samman nidhi yojana) 9 व्या हप्त्याबद्दल मोठी बातमी समोर आलीय. कृषी मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 9 ऑगस्ट रोजी पीएम किसान सन्मान निधीचा 9 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाणार आहे. आम्ही आपल्याला पहिल्या हप्त्याची माहिती सातत्याने देत आहे. गेल्या आठवड्यात असेही सांगण्यात आले होते की, 10 ऑगस्टपर्यंत पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचू शकतो.

माहिती पहा व्हिडीओ स्वरूपात 

या योजनेत नोंदणी केली नसेल तर उशीर करू नका

जर तुम्ही अद्याप या योजनेत नोंदणी केली नसेल तर उशीर करू नका. तुम्ही या आठवड्यात नोंदणी केली, तर हे शक्य होणार आहे. पडताळणीनंतर तुम्हाला 9 व्या हप्त्याचा (9 installment of pm kisan) लाभ देखील मिळू शकेल. त्याची ऑफलाईन आणि ऑनलाईन नोंदणी (online registration) खुली आहे. केवळ गेल्या दोन महिन्यांत 21 हजार कोटी रुपये थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर शेतीसाठी पाठवण्यात आलेत.

अशा प्रकारे अर्ज करा

पीएम-किसान पोर्टलला भेट द्या (@pmkisan.gov.in). एक पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला फार्मर कॉर्नर्सचा पर्याय दिसेल. त्यावर नवीन फार्मर रजिस्ट्रेशन मिळेल. यावर क्लिक करा. यानंतर तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल.

हे पण वाचा:- नवा सातबारा : ‘ह्या’ आहेत 11 नव्या सुधारणा वाचा सविस्तर!

फॉर्म पूर्ण भरा, त्यात योग्य माहिती भरा

यामध्ये तुम्हाला आधार कार्ड आणि कॅप्चा टाकण्यास सांगितले जाईल. तो भरल्यानंतर Click Here वर क्लिक करावे लागेल. यावर क्लिक केल्यावर एक नवीन पान उघडेल, ज्यात तुम्हाला फॉर्म दिसेल. हा फॉर्म पूर्ण भरा, त्यात योग्य माहिती भरा.

सातबारा क्रमांक आणि खाते क्रमांक भरा आणि सेव्ह करा

यामध्ये बँक खात्याची माहिती भरताना आयएफएससी कोड व्यवस्थित भरा आणि सेव्ह करा. त्यानंतर दुसरे पान उघडेल, ज्यात तुम्हाला तुमच्या जमिनीचा तपशील विचारला जाईल. सातबारा क्रमांक आणि खाते क्रमांक भरा आणि सेव्ह करा. तुमची नोंदणी प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.

चार हजार रुपये मिळणार

पंतप्रधान किसानन्मान निधीशी संबंधित डेटाची ही बाब आहे. आता आपल्या फायद्याबद्दल बोलूया. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 4000 हजार रुपये मिळण्याची संधी आहे. यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. या वर्षाचा पहिला हप्ता जारी झालाय आणि दोन हप्ते शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत पात्र शेतकरी ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही, जर त्यांनी स्वतःची नोंदणी केली, तर त्यांना आठव्या आणि नवव्या हप्त्याचे 2-2 हजार मिळू शकतात म्हणजे एकूण चार हजार रुपये मिळणार आहेत.

Source:- TV9 Marathi

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

1 thought on “शेतकऱ्यांसाठी खुषखबर! 9 व्या हप्त्याचे 2000 रुपये ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व