Search
Generic filters

पीएम किसान योजनेचा 9 वा हप्ता आला, अशी पहा गावातील शेतकऱ्यांची यादी !

पीएम किसान योजनेचा 9 वा हप्ता आला, अशी पहा गावातील शेतकऱ्यांची यादी !

पीएम किसान योजनेचा 9 वा हप्ता आला, अशी पहा गावातील शेतकऱ्यांची यादी !

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान योजनेच्या (Pm Kisan Yojana) नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या (farmers) बँक खात्यात (Bank Account) 2000 रुपये वर्ग केला आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हा 9 वा हप्ता आहे. यावेळी सुमारे 9 कोटी 75 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 19 हजार 500 कोटी रुपये पाठवले.

व्हिडीओ मध्ये पाहू शकता कशी पाहायची लिस्ट व्हिडीओ पूर्ण पहा तरच समजेल

खालील लिंक वर जाऊन बघा आपल्या गावाची यादी  

आपल्या राज्याचे नाव सिलेक्ट करून जिल्हा व तालुका सिलेक्ट करावा, त्यानंतर आपले गाव सिलेक्ट केले की पूर्ण गावातील शेतकरी बांधवांची यादी आपणास खालील लिंकवर पहायला मिळेल.

अर्जाची स्थिती कुठे पाहायची?

जर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आधीच अर्ज केला असेल. परंतु, आजपर्यंत तुमच्या खात्यात पैसे आले नसतील, तर त्याची स्थिती जाणून घेणे खूप सोपे आहे. पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर भेट द्या. तिथे फार्मर कॉर्नरवर जाऊन, तुम्ही तुमचा आधार, मोबाईल आणि बँक खाते क्रमांक टाकून पैसे येण्याची स्थिती जाणून घेऊ शकता.

अर्ज कुठे करायचा

पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास पात्र शेतकऱ्यांसाठी नोंदणी सुरू आहे. तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइटवर pmkisan.gov.in भेट देऊन स्वतः अर्ज करू शकता. यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याला भेटण्याची गरज नाही.

हे पण वाचा:- राष्ट्रीय खाद्य तेल मिशन योजना जाहीर वाचा सविस्तर माहिती

यादीमध्ये नाव नसल्यास अशी तक्रार नोंदवा

जर आपण नोंदणी केली असेल आणि लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव दिसत नसेल तर आपण पीएम किसान वेबसाइटच्या हेल्पलाइन नंबरवर आपली तक्रार नोंदवू शकता.

-पीएम किसान हेल्पलाईन क्रमांक 155261 आहे

-पंतप्रधान किसान टोल फ्री क्रमांक- 1800115526

-पीएम किसान लँडलाईन क्रमांक आहे – 011-23381092, 23382401

-याशिवाय ई-मेलद्वारे तक्रार करून तुम्ही pmkisan-ict@gov.in या ई-मेल आयडीवरही काम करू शकता.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे माहिती मोफत मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा 

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व