Search
Generic filters

पीएम शेतकरी मानधन योजना : या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 3 हजार रुपयांची दरमहा पेंशन; जाणून घ्या सविस्तर

पीएम शेतकरी मानधन योजना : या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 3 हजार रुपयांची दरमहा पेंशन; जाणून घ्या सविस्तर

पीएम शेतकरी मानधन योजना : या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 3 हजार रुपयांची दरमहा पेंशन; जाणून घ्या सविस्तर

 

Krushi Kranti :- शेतकऱ्यांच्या (Farmers) आर्थिक मदतीसाठी आणि सुरक्षित वृद्धपकाळासाठी सरकारने पेंशन सुविधा पीएम शेतकरी मानधन योजना (PM Kisan Maandhan Yojana) सुरू केली आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (pm kisan samman nidhi) अंतर्गत सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचे 3 हफ्ते म्हणजेच एकूण 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देत असते. या योजनेअंतर्गत 8 हफ्ते म्हणजेच 16000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता शेतकऱ्यांचा 9 वा हफ्ता येणे बाकी आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी आणि सुरक्षित वृद्धपकाळासाठी सरकारने पेंशन सुविधा पीएम शेतकरी मानधन योजना सुरू केली आहे.

शेतकऱ्यांना मिळणार गॅंरेटीड पेंशन (Farmers will get guaranteed pension)

पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 60 वर्षांनंतर पेंशन दिली जाणार आहे. जर तुम्ही पीएम किसान मध्ये खाते धारक असाल तर कोणतीही कागदपत्रांची कारवाई करण्याची गरज नाही. तुमचे थेट रजिस्ट्रेशन पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेत सुद्धा होईल. या योजनेच्या अनेक सुविधा आणि फायदे आहेत.

हे पण वाचा:- पीएम किसान अर्ज करताना एका चुकीमुळं 2 हजार रुपये अडकतील, चूक दुरुस्त कशी करायची? वाचा सविस्तर

पंतप्रधान शेतकरी मानधन योजना काय आहे ( What is PM Kisan Maandhan Yojana )

पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, वयाच्या 60 वर्षे नंतर पेंशनची सुविधा आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांचे म्हातारपण सुरक्षित करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. या योजनेअंतर्गत 18 ते 40 वर्षापर्यंतचा कोणीही शेतकरी गुंतवणूक करू शकतो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 हजार रुपयांपर्यंत मासिक पेंशन मिळते.

मानधन योजनेसाठी गरजेचे कागदपत्र

1 आधार कार्ड (Aadhaar card)
2 ओळख पत्र (Identity card)
3 वयाचा दाखला/जन्माचा दाखला (Age certificate / birth certificate)
4 उत्पन्नाचा दाखला (Proof of income)
5 शेतज मीनीची माहिती (Agricultural land information)
6 बँक खाते पासबुक (Bank account passbook)
7 मोबाईल नंबर (Mobile number)
8 पासपोर्ट साइज फोटो (Passport size photo)

हे पण वाचा:- पीएम किसान सम्मान निधि : ‘या’ तारखेला येणार ९ व्या हप्त्याची रक्कम, वाचा सविस्तर!

लाभार्थींना फायदा

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 2 हजार रुपयांचे 3 हफ्ते म्हणजेच 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली जाते. शेतकऱ्यांनी पीएम किसान मानधन योजनेत भाग घेतला तर त्यांची नोंदणी सहज होऊ शकते. मानधन योजनेसाठी दरमहिना कापली जाणारी रक्कम शेतकरी न्मान निधीच्या तीन हफ्त्यांच्या रक्कमेतून कापली जाईल. म्हणजेच शेतकऱ्यांना त्यांच्या खिशातून पैसे द्यावे लागणार नाही.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

Source:- zee news

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *