Search
Generic filters

PM Kisan चे पैसे येत नाहीत?काळजी करू नका!योजना लागू झाल्यापासूनचे पैसे येतील तुमच्या खात्यावर.. पण कसे ते वाचा सविस्तर

PM Kisan चे पैसे येत नाहीत?काळजी करू नका!योजना लागू झाल्यापासूनचे पैसे येतील तुमच्या खात्यावर.. पण कसे ते वाचा सविस्तर

नवी दिल्ली | पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा देशातील ९.६७ कोटी शेतकरी वर्गाला लाभ होत आहे. परंतु असेही काही शेतकरी आहेत ज्यांना या योजनेत नोंदणी करून देखील लाभ मिळालेला नाही, तर काहीना एक-दोन हप्ते मिळाल्यानंतर लाभ मिळणे बंद झाले आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ न मिळण्यामागे अनेक कारणे आहेत. आज आम्ही आपल्याला पीएम किसान योजनेबाबतीत भेडसावणाऱ्या समस्यां आणि त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत आहोत.

पीएम किसान योजनेत फॉर्ममधील छोट्या मोठ्या चुकांमुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. 
  • समजा एखाद्या शेतकऱ्यांला काही तांत्रिक चुकांमुळे अद्याप या योजनेचा लाभ मिळाला नसेल, परंतु शेतकऱ्याचे नाव या योजनेत समाविष्ठ असले तर तांत्रिक चुका दुरूस्त केल्यानंतर त्याला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणे सुरू होईल. परंतु हा लाभ जेव्हापासून ही योजना सुरू आहे, तेव्हापासूनचे बुडालेले सर्व पैसे देखील शेतकऱ्यांना मिळवून देई. याविषयी सरकारच्यावतीने आधीच स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या लिंकवर जाऊन आपण त्याचा सविस्तर शासन निर्णय पाहू शकता. याचाच अर्थ कोणत्याही शेतकऱ्याचे नाव राज्य सरकार, अथवा केंद्रशासित प्रदेशातील सरकारव्दारे या योजनेच्या पोर्टलमध्ये समाविष्ठ करण्यात आले असेल आणि काही कारणास्तव ४-४ महिन्याच्या अंतराने २००० रूपयांचे हप्ते मिळत नसतील अशा सर्व शेतकऱ्यांना तांत्रिक दोष दूर झाल्यानंतर जेव्हापासून लाभ मिळालेला नाही असा सर्व लाभ देण्यात येईल.
  • समजा काही कारणास्तव एखाद्या शेतकऱ्याचे नाव या योजनेत सरकारव्दारे नाकारण्यात आले असेल तर त्यांना भविष्यात या योजनेचा लाभ मिळणार का? तर याचे उत्तर जर तुमच्या नावात असणारी चूक, बॅंक खाते नंबर मधील चुक, आधार नंबर मधील चुक याच्याशी निगडीत असेल तर या चुका दुरूस्त केल्यानंतर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ नक्की मिळेल.
  • समजा आपल्याला या योजनेचा लाभ मिळण्यात काही तांत्रिक दोष असतील तर ते दुरूस्त करता येतात का? तर याचे उत्तर होय असून तुम्ही देखील स्वतः यातील तांत्रिक दोष दूर करून पीएम किसान योजनेचा लाभ मिळवू शकता. किंवा जवळच्या कॉमन सर्विस सेंटरवर जाऊन हे दोष दूर करू शकता.
  • समजा आधार नंबर चुकीचा दिला गेला असेल तर काय करावे लागेल? यासाठी आपल्याला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फार्मर्स कॉर्नरवरील आधार एडिट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. याठिकाणी ओपन झालेल्या पेजवर आपण आपल्या आधार कार्डसंबंधित चुक दुरूस्त करू शकता.
  • समजा बॅंक खाते नंबर मध्ये चुक झाली असेल तर काय कराल? यासाठी आपल्याला कृषि विभागच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून लेखापाल करवी ही चूक दुरूस्त करून घ्यावी लागेल. ज्यामुळे तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेचा लाभ मिळू शकेल.
  • समजा पीएम किसान योजनेविषयी आपल्याला नेहमी अपडेट रहायचे असेल तर काय करणार? यासाठी आपल्याला आम्ही एक लिंक देत आहोत. ज्याच्या माध्यमातून तुम्ही मोबाईलमध्ये पीएम किसानचे अधिकृत अॅप डाऊनलोड करून माहिती घेऊ शकता. अथवा अधिकृत वेबसाईटवर देखील याची माहिती आपणास उपलब्ध होईल.PM Kisan चे पैसे येत

संदर्भ :- http://www.lokshahi.news/

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *