पीएम किसान सम्मान निधि : ‘या’ तारखेला येणार ९ व्या हप्त्याची रक्कम, वाचा सविस्तर!

पीएम किसान सम्मान निधि : 'या' तारखेला येणार ९ व्या हप्त्याची रक्कम, वाचा सविस्तर!

पीएम किसान सम्मान निधि : ‘या’ तारखेला येणार ९ व्या हप्त्याची रक्कम, वाचा सविस्तर!

 

krushi kranti :- केंद्र सरकारनं 24 फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Scheme) योजनेतील 9व्या हप्त्याचे (9th Installment) प्रत्येकी 2 हजार रुपये पुढील महिन्यात शेतकर्‍यांच्या (Farmers) खात्यात जमा होणार आहेत.

 

केंद्र सरकारनं (Central Government) 24 फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Scheme) योजनेतील 9 व्या हप्त्याचे प्रत्येकी 2 हजार रुपये पुढील महिन्यात शेतकर्‍यांच्या  खात्यात जमा होणार आहेत. या योजनेद्वारे सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपये  (Six thousand rupees) तीन हप्त्यांमध्ये देते. वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान पाठवला जातो. त्यामुळे या योजनेचा पुढील हप्ता पुढील महिन्यातच तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता असतो. हे पैसे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होतात. पीएम किसान सम्मान निधि

 

  • माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.

आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपली नाव नोंदणी (Registration for PM Kisan Samman Nidhi Yojana) करणं आवश्यक असून, त्याकरता शेतीसंबाधित कागदपत्रे, आधारकार्ड, बँक खाते, पत्त्याचा पुरावा, आणि पासपोर्ट आकाराचा फोटो लागतो. तुम्ही नावनोंदणी केलेली असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील.

हे वाचा:- What is crop insurance : पंतप्रधान पीक विमा योजना , कोणत्या पिकाला किती विमा मिळणार?

कोण होणार या योजनेस पात्र : (Who will be eligible for this scheme)

ज्यांची स्वतः च्या नावे जमीन आहे असे शेतकरी.

कोण आहेत अपात्र? (Who are ineligible?)

  • असे शेतकरी कुटुंब ज्यामधील एक किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती पुढील श्रेणीत येतात- व्यावसायिक डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सीए, आर्किटेक्ट मंडळी
  • घटनात्मक पदावरील शेतकरी, आजी आणि माजी मंत्री, लोकसभा आणि राज्यसभा खासदार, आमदार, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष हे सर्व या योजनेच्या बाहेर आहेत.
  • केंद्र सरकार/ राज्य सरकार आणि PSUs मध्ये सध्या काम करत असणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ /चतुर्थ वर्गीय आणि ग्रुप डी कर्मचारी सोडून)
  • केंद्र आणि राज्य सरकारमधील 10 हजारांपेक्षा जास्त पेन्शन घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या शेतीला देखील याचा लाभ नाही.
  • मागच्या वर्षी आयकर भरणारे शेतकरी योजनेच्या फायदा मिळणार नाही.
  • तुम्ही दुसऱ्याची जमिन भाड्याने घेऊन कसत असाल तरी या योजनेचा लाभ मिळणार नाही
  • नोंदणी प्रक्रियेत मुद्दाम चूक करणाऱ्यांना देखील फायद्यापासून वंचित राहावं लागेल.
  • काही अडचण असल्यास शेतकरी थेट मंत्रालयाशी संपर्क करू शकतात. (Farmers can contact the ministry directly if there is any problem.)

पुढील प्रक्रियेद्वारे जाणून घ्या तुमच्या खात्यात पैसे जमा होणार की नाही

– सर्वांत आधी पंतप्रधान किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in/ अधिकृत वेबसाइटवर जा.

– इथं उजव्या बाजूला ‘Farmers Corner’ हा पर्याय दिसेल, तिथं ‘Beneficiary Status’ पर्यायावर क्लिक करा.

– आता एक नवीन पेज उघडेल.

– या पेजवर, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक या पर्यायांपैकी एक निवडा.

– जो पर्याय निवडला आहे त्यावर क्लिक करा.

– तिथं संबंधित क्रमांक भरा.

– यानंतर ‘Get Data’ वर क्लिक करा.

– इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळेल.

– इथं शेतकऱ्याचे नाव, मोबाइल क्रमांक, आधार, राज्य, जिल्हा, गाव, खाते क्रमांक, नोंदणी तारीख आणि नोंदणी क्रमांक दिसेल.

– आता इथं Active आणि In Active ऑप्शन दिसेल.

– Active दिसत असेल तर तुमचे खाते सुरू आहे, असा याचा अर्थ आहे.

– म्हणजेच तुमच्या खात्यावर नववा हप्ता जमा होण्यात काहीही अडचण नाही.

हे वाचा:जमीन फेरफार उतारा ऑनलाईन कसा पाहायचा- वाचा सविस्तर

यादीतही तपासा नाव (Also check the name in the list)

लाभार्थ्यांच्या यादीत (Beneficiary List ) आपलं नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी पीएम किसानच्या वेबसाइटवर ‘Farmers Corner’ मध्ये ‘Beneficiary List’ वर क्लिक करा. तिथं राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गाव या लिस्टमधून आपले पर्याय निवडा. नंतर ‘Get Report’ वर क्लिक करा. लाभार्थ्यांची सगळी यादी दिसेल. आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून या यादीत तुम्ही तुमचे नाव आहे की नाही हे तपासू शकता. पीएम किसान सम्मान निधि

तक्रार करण्यासाठी संपर्क क्रमांक (Contact number to report)

काही अडचण असल्यास शेतकरी थेट मंत्रालयाशी संपर्क करू शकतात.

– पंतप्रधान किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266

– पंतप्रधान किसान हेल्पलाईन क्रमांक : 155261

– पंतप्रधान किसान लँडलाईन क्रमांक : 011- 23381092, 23382401

– पंतप्रधान किसान नवीन हेल्पलाईन : 011- 24300606

– आणखी एक हेल्पलाईन : 0120-6025109

– ईमेल आयडी: pmkisan-ict@gov.in

संदर्भ:- lokmat news18

हे वाचा:- डेअरी व्यवसायासाठी सरकार देत आहे अनुदान ; ६६ टक्के सब्सिडी घेऊन सुरू करा हा व्यवसाय

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *