Pm kisan samman nidhi yojana: शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला सातवा हप्ता अशी पहा गावानुसार यादी

Pm kisan saman nidhi yojana: शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला सातवा हप्ता अशी पहा गावानुसार यादी

 

Pm kisan samman nidhi yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वितरण करण्याच्या योजनेचा शुभारंभ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी देशातील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

 

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वितरण करण्याच्या योजनेचा शुभारंभ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी देशातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या या कार्यक्रमात 1 बटन दाबून 9 कोटी शेतकरी लाभार्थ्यांना 18 हजार कोटी रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेचा शुभारंभ पंतप्रधानांनी केला. पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपये थेट अनुदान दिलं जातं. 2 हजार रुपयाप्रमाणं तीनवेळा ही रक्कम बँकेत जमा होते.

 

पीएम किसान सन्मान योजना लाँच केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, शेतकऱ्याला भविष्याच्या दृष्टीने तयार करण्यावर सरकारचा भर आहे. आमच्या सरकारने नव्या धोरणाने काम सुरु केले. शेतकऱ्याला भविष्याच्या दृष्टीने तयार करण्यावर भर दिला. जगामध्ये काय नवे घडतेय, त्याची माहिती घेतली. सखोल अभ्यास केला आणि त्या दृष्टीने काम केले, असं ते म्हणाले.

शेतीविषयक माहिती इथे वाचा 

शेतकऱ्याची जमीन कोणी घेऊ शकणार नाही

 

ते म्हणाले की, शेतकऱ्याची जमीन कोणी घेऊ शकणार नाही. शेतकऱ्याच्या जीवनातील आनंद हा सर्वांचा आनंद आहे. आधी पीक वाया जायचे आता विकले जाते. कायद्यांवरुन शेतकऱ्यांच्या जमिनीवरुन भ्रम निर्माण केला जात आहे, असंही ते म्हणाले. ते म्हणाले की, आज रुपया चुकीच्या माणसाच्या हातात जातात नाही. आज दिल्लीवरुन रुपया निघतो, तेव्हा तो त्या व्यक्तीच्या खात्यात जमा होतो. संगणकाच्या एका क्लिकवरुन नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा झाले. यात कुठला कट नाही, हेराफिरी नाही. हेच सुशासन आहे, असं मोदी म्हणाले.

 

कसे पाहायचे

आपल्या  राज्याचे नाव सिलेक्ट करून जिल्हा व तालुका सिलेक्ट करावा, त्यानंतर आपले गाव सिलेक्ट केले की पूर्ण गावातील शेतकरी बांधवांची यादी आपणास खालील लिंकवर  पहायला मिळेल.

लिंक चालू झाली आहे 

https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx

 

आमच्या संत साहित्य ह्या वेबसाइटला नक्की भेट द्या


PM kisan , information in marathi ,  pm kisan list , pm kisan samman nidhi , Pm kisan samman nidhi yojana information in marathi , Pm kisan scheme , कृषि , krushi , कृषी in marathi , शेती विषयक माहिती , शेती विषयी माहिती , शेती माहिती

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *