Search
Generic filters

Pm kisan yojana : प्रतिक्षा संपली यादीत नाव तपासा अन् खात्री करुन घ्या, सन्मान निधी योजनेतील 10 हप्त्याची

Pm kisan yojana : प्रतिक्षा संपली यादीत नाव तपासा अन् खात्री करुन घ्या, सन्मान निधी योजनेतील 10 हप्त्याची

Pm kisan yojana : प्रतिक्षा संपली यादीत नाव तपासा अन् खात्री करुन घ्या, सन्मान निधी योजनेतील 10 हप्त्याची

 

शेतकऱ्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या (Kisan Sanman Yojana) किसान सन्मान योजनेचा आता 10 वा हप्ता काही दिवसांवरच येऊन ठेपलेला आहे. 15 डिसेंबर ते 25 डिसेंबरच्या दरम्यान हा 10 हप्ता लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तत्पूर्वी या योजनेअंतर्गत ज्यांना लाभ मिळणार आहे त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या प्रसिध्द करण्यात आलेल्या (List of Farmers) यादीत आपले नाव आहे का नाही याची तपासणी आता करता येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून 10 हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या अनुशंगाने यंत्रणा कामाला लागली आहे. आता अवघ्या काही दिवसांमध्ये ही 10 हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे.

यादीमध्ये असे शोधा आपले नाव

1. सुरवातीला पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या https://pmkisan.gov.in/. या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. त्यानंतर तुमच्या उजव्या बाजूला Formers Corner या नावाचा पर्याय समोर असणार आहे.
2. यामध्ये Beneficiary List म्हणजेच लाभार्थ्यांची यादी असणार आहे.
3. लाभार्थी यादीच्या पर्यायावर येथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
4. नवीन पानावर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, बॅंक आणि गावाची माहिती भरावी लागणार आहे. अन्यथा केवळ आधार कार्ड, किंवा तुम्ही दिलेल्या बॅंकेचा खातेक्रमांक टाकला तरी सर्व तपशील समोर येणार आहे.
5. संपूर्ण यादीच नाही तर केवळ तुमचे नावच येणार असल्याने ही पध्दत सोपी आहे.

 

खालील लिंकवर जाऊन आपण शोध आपले नाव पाहू शकता 

https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx

 

वर्षाकाठी 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर

अल्पभुधारक तसेच मध्यम शेतकऱ्याचे हीत लक्षात घेऊन ही शेतकरी सन्मान योजना सुरु करण्यात आली आहे. 4 महिन्याला 2 हजार याप्रमाणे वर्षाकाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये जमा होतात. यापुर्वी मोदी सरकारने 9 हप्ते जमा केलेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून 10 व्या हप्त्याची चर्चा ही सुरु आहे. कारण गतवर्षीही डिसेंबर महिन्यातच वर्षातला शेवटचा हप्ता जमा झाला होता. त्यामुळे यावेळीही 15 ते 25 डिसेंबरच्या दरम्यान ही रक्कम जमा होणार आहे.

हे पण वाचा:- मिनी डाळ योजना: शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी राज्य सरकारची काय आहे योजना?

आतापर्यंत 11 कोटी 37 लाख शेतकऱ्यांना मिळाला लाभ

केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ गरजू शेतकऱ्यांना होत आहे. आतापर्यंत देशातील 11 कोटी 37 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झालेला आहे. गतवर्षीही 25 डिसेंबर रोजीच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम अदा झाली होती. त्यामुळे यंदाही नेमक्या कोणत्या दिवशी रक्कम अदा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. आता या संदर्भातले काम अंतिम टप्प्यात आहे. दहाव्या हप्त्यासाठी लाभार्थी शेतकरी यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे.

 

source:- tv9 marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *