Search
Generic filters

PM Kisan yojana : ‘या’ कारणामुळे सुरु झाली योजना? रक्कम जमा होत असतानाच पंतप्रधान मोदींनी सांगितले कारण!

PM Kisan yojana : 'या' कारणामुळे सुरु झाली योजना? रक्कम जमा होत असतानाच पंतप्रधान मोदींनी सांगितले कारण!

PM Kisan yojana : ‘या’ कारणामुळे सुरु झाली योजना? रक्कम जमा होत असतानाच पंतप्रधान मोदींनी सांगितले कारण!

 

देशभरात 86 टक्के शेतकरी हे अल्पभुधारक आहेत. त्यांना पायाभूत सोईसुविधा मिळाव्यात त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा हेच केंद्र सरकारचे धोरण आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे हा निर्धारच केंद्र सरकारने केलेला आहे.  पीएम किसान सन्मान योजना सुरु करावी अशी मागणी सरकारकडे कुणी केलीच नव्हती. मात्र, देशातील अल्पभुधारक शेतकऱ्यांची परस्थिती पाहूनच हा निर्णय घेण्यात आला होता. आता या योजनेमुळे शेती व्यवसयासाठी आवश्यक पायाभूत बाबी अल्पभुधारक शेतकऱ्यांना घेता येत असल्याचेही  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. शनिवारी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करीत असताना त्यांनी हे सांगितले आहे. देशभरातील 10 कोटी 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे.

ही अशी पहिलीच योजना

आतापर्यंत अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. पण पीएम किसान सन्मान योजना ही एक अशी योजना आहे की, ज्यामधून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. ना कोणी मध्यस्ती ना कोणती कपात थेट आर्थिक लाभ मिळवून देणारी ही पहिलीच य़ोजना असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 1 लाख 80 हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत शिवाय यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडलेला नाही हे विशेष. यामुळे शेतकऱ्यांना सरकारप्रती अधिक विश्वास दृढ होत आहे. शेतकऱ्यांच्या हीताच्या अनुशंगाने होत असलेल्या निर्णयाचा थेट फायदा होत असून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होत आहे.

हे पण वाचा:- पीएम किसानचा 10 वा हप्ता जारी, शेतकरी उत्पादन कंपन्यांना 14 हजार कोटींचं अनुदान

या धनराशीचा योग्य वापर

ही योजना अल्पभुधारक शेतकरीच केंद्रस्थानी ठेऊन सुरु करण्यात आलेली आहे. त्यामुळे वर्षभराच्या या रकमेतून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, अवजारे तसेच शेती मधील इतर कामे करण्यास या निधीचा वापर होत आहे. केंद्र सरकाच्या निधीचा थेट लाभ शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर होत असल्याने याचे मोठे समाधान असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून अल्पभुधारक शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा उद्देश साध्य होत असल्याचेही यावेळी मोदी यांनी सांगितले.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

https://contact.krushikranti.com/

 

source:- tv9 marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published.