Search
Generic filters

पीएम किसान योजना : शेतकऱ्यांच्या नावाची अशी होते निवड? वाचा सविस्तर

पीएम किसान योजना

पीएम किसान योजना : शेतकऱ्यांच्या नावाची अशी होते निवड? वाचा सविस्तर

 

पीएम किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन टप्प्यात एका वर्षाला 6 हजार रुपये जारी केले जातात. आतापर्यंत 8 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. (pm kisan samman nidhi yojana)

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर एका वर्षात सहा हजार रुपये पाठवते. हे सहा हजार रुपये तीन टप्प्यात 2-2 हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा वापर केला जातो. पंतप्रधान किसान सन्मान योजनेबद्दल शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न असतात. त्यापैकीच एक प्रश्न म्हणजे कोट्यावधी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी कशी तयार केली जाते. 

पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी कशी तयार करतात? How does the Prime Minister compile the list of beneficiaries of Kisan Sanman Yojana?

पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटवरील माहिती नुसार शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज केल्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांकडे असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या रेकॉर्डची तपासणी केली जाते. लाभार्थी शेतकऱ्यांनी अर्जासोबत जोडलेल्या जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते, यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांचे नाव योजनेमध्ये समाविष्ट करून घेतले जाते. केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या आतापर्यंतची ही सर्वात यशस्वी योजना समजली जाते.

शेतकऱ्यांच्या नावावर शिक्कामोर्तब कसं होतं?

शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी अर्ज केल्यानंतर त्यामधील जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. शेतकऱ्यांनी अर्ज सोबत जोडलेली कागदपत्रं योग्य असल्याचं समोर आल्यास त्याचे नाव पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादी मध्ये समाविष्ट केलं जातं. पोर्टलवर शेतकऱ्याच्या कुटुंबाविषयी माहिती अपलोड करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र शासित प्रदेश यांची असते. लाभार्थी यादी मध्ये नाव समाविष्ट झाल्यानंतरच पी एम किसान योजनेच्या दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जातो.

किती जमीन असणारे शेतकरी अर्ज करू शकतात?

पीएम किसान योजनेच्या नियमानुसार कोणताही शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतो. 2019 मध्ये पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू झाली तेव्हा दोन हेक्‍टरपेक्षा कमी जमीन असणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले होते.

पीएम किसानचा लाभ कुणाला मिळत नाही?

पीएम किसान योजनेच्या नियमानुसार सरकारी कर्मचारी, आयकर भरणारे शेतकरी, डॉक्टर, इंजिनियर, दहा हजार रुपये पेन्शन मिळणारे सेवानिवृत्त कर्मचारी खासदार, आमदार हे या योजनेचे लाभ घेऊ शकत नाहीत. आतापर्यंत देशातील 11 कोटी 82 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे.

संदर्भ:- TV9 Marathi

खालील माहिती पण वाचा:-

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *