पीएम किसान योजना : सरकारने बदलले नियम! ‘या’ कागदपत्राशिवाय शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत!

पीएम किसान योजना

पीएम किसान योजना : सरकारने बदलले नियम! ‘या’ कागदपत्राशिवाय शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत!

youtube

तुम्ही पीएम किसानचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही खूप उपयुक्त बातमी आहे. सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे  नियम बदललेत. पीएम किसान योजनेत  होणाऱ्या फसवणुकीसाठी सरकारने रेशन कार्ड अनिवार्य केलेय. आता शेतकऱ्यांना इतर कागदपत्रांसह शिधापत्रिका द्यावी लागणार आहे. त्याशिवाय हप्ता मिळणार नाही.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकेल

रेशनकार्ड क्रमांक आल्यानंतरच पती किंवा पत्नी किंवा त्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकेल. या योजनेंतर्गत नवीन नोंदणीवर शिधापत्रिका क्रमांक देणे बंधनकारक असेल. याशिवाय कागदपत्राची सॉफ्ट कॉपी तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागेल.

आता ही कागदपत्रे द्यावी लागणार

जर तुम्ही पंतप्रधान किसान योजनेंतर्गत पहिल्यांदा नोंदणी केली तर अर्जदाराला शिधापत्रिका क्रमांक अपलोड करावा लागेल. याशिवाय PDF देखील अपलोड करावी लागणार आहे. आता सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राच्या हार्ड कॉपी जमा करणे बंधनकारक करण्यात आलेय. आता कागदपत्रांची PDF फाईल तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. यामुळे पीएम किसान योजनेतील फसवणूक कमी होईल. तसेच नोंदणी करणे पूर्वीपेक्षा सोपे होईल.

हे पण वाचा:- E-Panchanama : राज्य सरकारचे नवे धोरण ई-पीक पाहणी नंतर आता ‘ई-पंचनामा’

या तारखेला हप्ता येणार

सरकारने पीएम किसान (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेंतर्गत 10 वा हप्ता जारी करण्याची तारीख निश्चित केलीय. हप्ता हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत आगाऊ नोंदणी करावी जेणेकरून त्यांना 10 व्या हप्त्याचा लाभ घेता येईल. केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता जारी करण्याचा विचार करत आहे. सरकारने गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित केले होते.

सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये देते

पंतप्रधान किसान योजनेंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. शासन ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाइन वर्ग करते. तुम्हीही शेतकरी असाल पण या योजनेचा लाभ घेऊ शकत नसाल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही PM किसान सन्मान निधी मध्ये तुमचे नाव देखील नोंदवू शकता, जेणेकरून तुम्हाला सरकारच्या योजनेचा लाभ घेता येईल.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

source:- tv9 marathi

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

2 thoughts on “पीएम किसान योजना : सरकारने बदलले नियम! ‘या’ कागदपत्राशिवाय शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत!”

  1. सतीश भरदे

    पूर्वी नोदणी केलेल्या शेतकऱ्याला परत कागत पत्रे pdf करून पाठवावी लागेल काय

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *