PM Kisan Scheme : पीएम किसानचा 9 वा हप्ता जारी !

PM Kisan Scheme : पीएम किसानचा 9 वा हप्ता जारी

PM Kisan Scheme : पीएम किसानचा 9 वा हप्ता जारी !

 

krushi kranti : पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान योजनेच्या (Pm Kisan Yojana) नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या (farmers) बँक खात्यात (Bank Account) 2000 रुपये वर्ग केला आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हा 9 वा हप्ता आहे. यावेळी सुमारे 9 कोटी 75 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 19 हजार 500 कोटी रुपये पाठवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. महाराष्ट्रातील (Maharashtra) रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी देवेंद्र जापडेकर यांच्याशी नरेंद्र मोदींशी संवाद साधला.

  • माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.

9 कोटी 75 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार कोटी वर्ग

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संवाद साधल्यानंतर पंतप्रधान शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार 500 कोटी रुपये वर्ग कण्यात आले आहेत. 9 कोटी 75 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजारांचा नववा हप्ता जारी करण्यात आला आहे.

11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 1 कोटी 37 लाख रुपये वर्ग

केंद्रीय कृषीमंत्री  नरेंद्र सिंह तोमर हे केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती देत आहेत. पीएम किसान योजना, पीक विमा योजना याचा फायदा झाला असल्याचं  त्यांनी सांगितलं. पीएम किसान योजनेद्वारे 6 हजार रुपये देतात हा विषय नाही. नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करत आहेत. यापूर्वी 11  कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 1 कोटी 37 लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

हे पण वाचा:- जमीन खरेदी विक्रीसाठी ‘या’ गोष्टीची परवानगी आवश्यक, परिपत्रकात नेमकं काय म्हटलंय?

अर्जाची स्थिती कुठे पाहायची?

जर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आधीच अर्ज केला असेल. परंतु, आजपर्यंत तुमच्या खात्यात पैसे आले नसतील, तर त्याची स्थिती जाणून घेणे खूप सोपे आहे. पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर भेट द्या. तिथे फार्मर कॉर्नरवर जाऊन, तुम्ही तुमचा आधार, मोबाईल आणि बँक खाते क्रमांक टाकून पैसे येण्याची स्थिती जाणून घेऊ शकता.

अर्ज कुठे करायचा

पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास पात्र शेतकऱ्यांसाठी नोंदणी सुरू आहे. तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइटवर pmkisan.gov.in भेट देऊन स्वतः अर्ज करू शकता. यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याला भेटण्याची गरज नाही.

मोदी सरकारची सर्वात यशस्वी योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान योजना जाहीर केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या खात्यात 8 हप्त्यांमध्ये पीएम किसान योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. योजनेचा नववा हप्ता आज जारी करण्यात आला.

source:- TV9 Marathi

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *