पीएम किसान अर्ज करताना एका चुकीमुळं 2 हजार रुपये अडकतील, चूक दुरुस्त कशी करायची? वाचा सविस्तर

पीएम किसान अर्ज करताना एका चुकीमुळं 2 हजार रुपये अडकतील, चूक दुरुस्त कशी करायची? वाचा सविस्तर

पीएम किसान अर्ज करताना एका चुकीमुळं 2 हजार रुपये अडकतील, चूक दुरुस्त कशी करायची? वाचा सविस्तर

 

अर्ज भरताना जर आपली माहिती नोंदवताना एखादी चूक झाली तर पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना (Farmer) मिळणार नाहीत. जर, प्रधानमंत्री सन्मान योजनेचा अर्ज दाखल करतानाचं काही चूक झाली असेल तर अर्ज सादर करण्यापूर्वी दुरुस्त करुन घ्यावी

 

  • माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.

(PM Kisan Scheme) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा नववा हप्ता लवकरच जारी करण्यात येणार आहे. मोदी सरकारच्या सर्व योजनांमध्ये पीएम किसान योजना सर्वात यशस्वी असल्याचे म्हटले जाते. या योजनेंतर्गत सरकार देशातील शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत करते. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये मिळतात. प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवली जाते. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागेल. अर्ज भरताना जर आपली माहिती नोंदवताना एखादी चूक झाली तर पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार नाहीत. जर, प्रधानमंत्री सन्मान योजनेचा अर्ज दाखल करतानाचं काही चूक झाली असेल तर अर्ज सादर करण्यापूर्वी दुरुस्त करुन घ्यावी.

हे पण वाचा:- पीएम किसान योजना : 6 हजार रु. पती-पत्नी दोघांनाही मिळतात का? नेमका नियम काय?

या चुका होतात

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा अर्ज दाखल करताना शेतकरी आधार क्रमांक किंवा काही वेळा बँक खाते क्रमांक चुकीच्या पद्धतीने भरतात. चुकीची माहिती भरली गेली असल्यानं शेतकऱ्यांना योजनेची रक्कम मिळत नाही. त्यामुळे प्रतप्रधान किसान सन्मान योजनेचा हप्ता जाहीर होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी त्यांची माहिती दुरुस्ती करुन घेणं आवश्यक आहे. आपण आधार क्रमांक चुकीच्या पद्धतीने प्रविष्ट केला असेल तर आपण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर (pmkisan.gov.in) भेट देऊन ते दुरुस्त करू शकता.

कशी दुरुस्ती करायची

आपल्याला पीएम किसानच्या वेबसाइटवर ‘फार्मर कॉर्नर’ सापडेल. त्यावर क्लिक केल्यानंतर आपण आपली माहिती दरुस्त करू शकता. तुम्हाला तुमच्या बँक खाते क्रमांकामध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या कृषी विभागाच्या कार्यालयात किंवा लेखापालशी संपर्क साधावा लागेल.

पुढील महिन्यात नववा हप्ता जारी होण्यााची शक्यता

आतापर्यंत केंद्र सरकारने डीबीटीमार्फत पीएमक किसान योजनेचे आठ हप्ते जाहीर केले आहेत. आतापर्यंत देशातील 11.82 कोटी शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, पंतप्रधान पीएम किसनचा नववा हप्ता ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल.

हे पण वाचा:- वेगवेगळ्या पिकावरील वेगवेगळी तणनाशके वाचा सविस्तर !

पीएम किसानचा लाभ कुणाला मिळत नाही

पीएम किसान सन्मान योजनेत सरकारी कर्मचारी किंवा प्राप्तिकर भरणारे शेतकरी पात्र मानले जात नाहीत. याशिवाय दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळणारे डॉक्टर, अभियंता, सीए आणि कर्मचारीही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. खासदार आणि आमदारांनाही पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळत नाही. आतापर्यंत देशातील 11.82 कोटी शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. केंद्र रकारने असे म्हटले आहे की वार्षिक 6 हजार रुपये त्याच शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग केले जातील, ज्याच्या नावावर शेती असेल.

संदर्भ:- TV9 Marathi

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *